काल काय ऐकलं खरं हाय का...महिला नगरसेविकांच्या 'पतीराजां'ना बैठकीतून बाहेरचा रस्ता; पक्षाच्या सर्वेसर्वांनी झाडले खडेबोल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 16, 2026

काल काय ऐकलं खरं हाय का...महिला नगरसेविकांच्या 'पतीराजां'ना बैठकीतून बाहेरचा रस्ता; पक्षाच्या सर्वेसर्वांनी झाडले खडेबोल..

काल काय ऐकलं खरं हाय का...महिला नगरसेविकांच्या 'पतीराजां'ना बैठकीतून बाहेरचा रस्ता; पक्षाच्या सर्वेसर्वांनी झाडले खडेबोल..
​बारामती :-नुकताच एक चर्चा रंगत आहे की,नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीत महिला नगरसेविकांच्या वतीने बैठकीत हजर राहिलेल्या त्यांच्या पतीराज आणि नातेवाईकांची पक्षाच्या सर्वेसर्वांनी चांगलीच खरडपट्टी काढत त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवल्याची घटना घडली आहे.
​नेमकी घटना काय?
​नियोजित विकास कामांची आणि राजकीय रणनीतीची चर्चा करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नियमांनुसार निवडून आलेल्या महिला जनप्रतिनिधींनी स्वतः बैठकीत उपस्थित राहणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी त्यांच्या जागी त्यांचे पती, भाऊ किंवा इतर नातेवाईक हजर राहून बैठकीत निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनुभव वारंवार येतो.
​या बैठकीतही अनेक महिला नगरसेविकांऐवजी त्यांचे पतीराज उपस्थित असल्याचे पक्षाच्या सर्वेसर्वांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सर्वेसर्वांनी बैठकीच्या सुरुवातीलाच या  उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेतला.
​'कारभार महिलांनी चालवायचा की त्यांच्या पतीने?'
​बैठकीत कडक शब्दांत तंबी देताना सर्वेसर्वांनी स्पष्ट केले की, जनतेने महिलांना नगरसेविका म्हणून निवडून दिले आहे, त्यांच्या पती किंवा नातेवाईकांना नाही. त्यामुळे प्रशासकीय किंवा पक्षाच्या अधिकृत बैठकांमध्ये पतीराज किंवा इतर नातेवाईकांनी परस्पर हस्तक्षेप करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम भरण्यात आला. यानंतर उपस्थितांपैकी संबंधित नातेवाईकांना तात्काळ बैठक कक्ष सोडण्याचे आदेश देण्यात आले.
​राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
​घटना घडल्यानंतर राजकीय वर्तुळात या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. 'पॉवरफुल पतीराज' संस्कृतीला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने घेतलेल्या या भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असून, यामुळे महिला नगरसेविकांना खऱ्या अर्थाने निर्णयक्षम स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे बैठकीला बोलवयाचे आणि अपमान करायचा, फक्त नगरसेविका यांनी यावे नातेवाईकांनी येऊ नये असा मेसेज करायचा होता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा रंगू लागल्या आहे.

No comments:

Post a Comment