कामगार क्षेत्राच्या आस्तित्वा साठी एकत्र यावे यासाठी कामगार नेते बाळासाहेब डेरे यांच्याकडून गोपी गिलबिले यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन ;बारामती मध्ये कर्मचारी प्रतिनिधी साठी 'नेतृत्वगुण विकास ' मार्गदर्शन संपन्न
बारामती(प्रतिनिधी):- कामगाराचा शत्रू हा कामगारांच्या आप आपसातील मतभेद असतात अधिकारी किंवा प्रशासन नसते. कामगाराच्या उन्नतीसाठी व उज्वल भविष्यासाठी व अस्तित्वासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्व कर्मचारी संघटना व कामगारांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले यांनी प्रतिपादन केले.
बारामती एमआयडीसी येथील फेरेरो कामगार संघटना यांच्या वतीने बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, फलटण तालुक्यातील कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यासाठी 'नेतृत्वगुण विकास'
या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गोपी गिलबिले यांनी उपस्तीत कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष शिवाजी खटकाळे, पुणे जिल्हा साखर कामगार समन्वय समिती अध्यक्ष राजेंद्र तावरे,
श्रायबर डायनामिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कचरे, सुयश ऑटो कामगार सेना अध्यक्ष भारत जाधव ,किर्लोस्कर फ़ेरर्स कामगार संघटना अध्यक्ष कल्याण कदम व एमआयडीसी मधील कामगार संघटना व त्यांचे प्रतिनिधी उपस्तीत होते.
संघटना वेगवेगळ्या असतील पण कामगारांचा विचार एक असला पाहिजे व कामगारांच्या हिताचे ध्येय समान असले पाहिजे या सामुहिक विचारातून सक्षम जागरूक आणि एकजुटीची कामगार चळवळ उभी करण्यासाठी हे पहिले पाऊल असल्याचे प्रास्तविक मध्ये फेरेरो कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी सांगितले.
साखर कारखाना क्षेत्रात कामगारांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमानात होत असताना राजकीय बळ वापरून संघटना मोडीत काढण्याचे काम साखर महर्षी करत असल्याचा आरोप साखर कारखाना कामगार नेते राजेंद्र तावरे यांनी सांगितले
कामगार एक झाला नाही पाहिजे व भांडवलदाराचा विजय झाला पाहिजे यासाठी राजकीय व उद्योजक एकत्र येऊन कामगार संघटना मोडीत काढत आहेत तरी कामगारांनी एकजुटीने राहावे असे आवाहन श्रायबर डायनॅमिक्स डेअरी चे कामगार नेते पांडुरंग कचरे यांनी केले.
आपापसातील मतभेद बाजूला ठेवून केवळ कामगार जात म्हणून एकत्र या व जातीपातीचे राजकारण सोडून कामगारांच्या भल्यासाठी कार्य केले तरच येणाऱ्या काळात कामगार जात जिवंत राहणार असल्याचे राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे यांनी सांगितले.
बारामती मध्ये भव्य कामगार परिषद व कार्यशाळा आयोजन करण्याचे सर्वांमध्ये ठरवण्यात आले. राज्य व केंद्र शासनाचे कामगार विषयक बदलते धोरण व त्याचे परिणाम या विषयी मनोगत व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सावळेपाटील यांनी केले.
चौकट:
फेरेरो कामगार संघटना यांनी पुढाकार घेऊन सर्व विचारांच्या संघटनांना एका व्यासपीठावर आणल्याबद्दल उपस्तीत सर्वांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment