गोळीबार फायरिंग करणारे आरोपी केले आठ तासात जेरबंद;बारामती तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांची कामगिरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2026

गोळीबार फायरिंग करणारे आरोपी केले आठ तासात जेरबंद;बारामती तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांची कामगिरी..

गोळीबार फायरिंग करणारे आरोपी केले  आठ तासात जेरबंद;बारामती तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांची कामगिरी..                     
 
बारामती :-दिनांक.21/11/2026 रोजी 18:00 वा चे सुमारास फिर्यादी नामे राजन धनंजय कोळेकर, वय.35 वर्ष रा. अनन्या व्हिला, शिवशंभो नगर, नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे बारामती  यांचेवर इसम नामे 1) बंड्या उर्फ अक्षय काळे, व त्याचे दोन साथीदार यांनी फिर्यादी यांना दोन लाख रुपये खंडणी मागणी केली असता ती देण्यास नकार दिल्याचे कारणावरून फिर्यादी यांचे  बंगल्याचे पार्किंग मध्ये लावलेल्या फोर व्हीलर गाडीवर फायरिंग करून पळून गेले होते त्यावरून बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर.576/2026, भारतीय न्याय संहिता सन.2023 चे कलम 308 (3), 308(4) ,3(5) भारतीय शस्त्र अधिनियम 35 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदर गुन्हातील आरोपींचा शोध घेणे कामी 5 तपास टिम रवाना करण्यात आल्या होत्या. आरोपी यांचा शोध घेत असताना दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांना  ताब्यात घेवुन विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली आहे त्यांचे ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेले दोन पिस्टल गुन्ह्याचे पुरावा कमी जप्त करण्यात आलेले आहे . सदरचा गुन्हा यांचा साथीदार बंड्या उर्फ अक्षय काळे याचे बरोबर जाऊन केला असल्याचे सांगितले आहे त्याचा शोध घेऊन त्यास अटक करून 
गुन्हाचा पुढील तपास विक्रम पवार, सहा. पोलीस. निरीक्षण करीत आहेत.

  सदरची कामगिरी मा.संदीप सिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक ,बारामती विभाग पुणे ग्रामीण, मा.चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली नारायण पवार, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस स्टेशन, विक्रम पवार, सहा.पोलीस. निरीक्षक, बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास टीम व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण तपास टीम यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment