बारामती :- दिनांक १८/१०/२०२६ रोजी सायंकाळी १९/१० वाचे सुमारास पायलट ढाब्याचे समोर पालखी महामार्गावर राणा दिलीप सुर्यवंशी यांचेवर दोन आज्ञात मुलांनी सशस्त्र हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून फिर्यादी लक्ष्मीकांत महादेव सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ५२१/२०२६ भा न्या सं कायदा कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ११५(२) ३(५) आर्म अॅक्ट कलम ३,४,२५ प्रमाणे दिनांक १९/१०/२०२६ रोजी गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयाच्या तपासात १) विधी संघर्षग्रस्त बालक व २) पार्थ वासुदेव अवथळे वय १९ वर्ष मुळ रा पिंपरी गवरी ता. खामगाव जि बुलढाणा सद्या रा कर्वेनगर, दत्तमंदिर कॅनल रोड स्पेन्सर चौक पुणे यांना पुणे शहर पोलीस यांनी पकडून पुणे ग्रामीण पोलीसांचे ताब्यात दिले होते.विधी संघर्षग्रस्त बालक व आरोपी नामे पार्थ वासुदेव अवथळे यांचेकडे विचारपूस केली असता त्यांना इसम नामे श्री ज्ञानदेव महादेव शिंदे वय ५० वर्षे धंदा चालक व मॅनेजमेंट रा. मुळ रा मु.पो वीट ता करमाळा जि सोलापूर सद्या रा. स्वामी समर्थ मंदिरासमोरील साई लिला बिल्डींग,थोरातनगर, भिगवण ता इंदापूर जि पुणे याने सदर गुन्हा करणे करिता दोन लाख रूपये दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने तांत्रीक विश्लेषण करुन सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपीत
नामे १) पार्थ वासुदेव अवथळे वय १९ वर्षे २) श्री ज्ञानदेव महादेव शिंदे वय ५० वर्षे यांना आज
दिनांक २०/१०/२०२६ रोजी अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने
त्यांची दिनांक २३/१०/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर
गुन्हयाचा हेतु व इतर आरोपींचे सहभागाबाबत पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment