धक्कादायक..बारामतीत गोळीबार करून सतुराने हल्ला... गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 18, 2026

धक्कादायक..बारामतीत गोळीबार करून सतुराने हल्ला... गुन्हा दाखल.

धक्कादायक..बारामतीत गोळीबार करून सतुराने हल्ला... गुन्हा दाखल.
बारामती :- बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं 521/2026 भा.न्या. संहिता कलम 109(1), 118(1) (2),115(2), 3(5), आर्म अॅक्ट 4/25, 3/25,27 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्री लक्ष्मीकांत महादेव सुर्यवंशी वय- 42 वर्ष, धंदा- रियल इस्टेट रा. मु. जाचकवस्ती पो. सणसर ता. इंदापुर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हंटले की,दि.18/10/2026 रोजी सायं 19/10 वा चे सुमा पालखी महामार्गावर विमानतळ रेल्वे ब्रिजचे पुढे कटफळ बाजुकडुन पायलट ढाब्याजवळ बारामती ता बारामती जि पुणे येथे  सायंकाळी 19.10 वाचे सुमारास मी श्री राणा दिलीप सुर्यवंशी असे आम्ही पालखीमहामार्गावर विमानतळ रेल्वे ब्रिजचे पुढे पायलट ढाब्याजवळ ऊभा असताना कटफळ बाजूकडून एका स्कुटी मोटार सायकल वरून दोन अज्ञात मुले येवून त्यापाठीमागे बसलेल्या अंगात थंडीचे जॅकेट घातलेले व तोंडाला मास्क लावून आलेल्या मुलाने श्री राणा दिलीप सुर्यवंशी यांना बुके देण्याच्या बहाणा करुन त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे दिशेन पिस्टलने फायरिंग केली. त्यांचे ऊजव्या हाताचे दंडावर लोखंडी सतुराने वार केले त्यामध्ये त्यांचे उजव्या हाताचे दंडाला व पोटाचे उजव्या बाजूला गंभीर जखमी करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून माझी मास्क घातलेला अनोळखी इसम व त्याचे सोबत स्कुटी चालवून घेवून आलेला अज्ञात इसम या दोघांविरूध्द कायदेशिर फिर्याद देण्यात आली असून मपोसई भगत मॅडम यांनी दाखल करून या घटनेचा तपास अधिकारी- पोनि / नारायण पवार करीत आहे.

No comments:

Post a Comment