अंजनगाव नजीक (वर्तमळा) येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न; 'खेळ रंगला पैठणीचा' कार्यक्रमात महिलांचा सहभाग..
बारामती :- बारामती तालुक्यातील नंबर वन व्यासपीठ ठरलेल्या अंजनगाव नजीक (वर्तमळा) येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सवात यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेला 'खेळ रंगला पैठणीचा' (होम मिनिस्टर) हा कार्यक्रम खेड्यापाड्यातील सर्व महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि हास्यविनोदाच्या बरसातमुळे संस्मरणीय ठरला. होम मिनिस्टर प्रस्तुत कार्यक्रमाची झलकप्रसिद्ध निवेदक सलीम सय्यद यांच्या बहारदार सूत्रसंचालन व गायन आणि लोकप्रिय विनोदी कलाकार बाळासाहेब बनसोडे यांच्या खळाळत्या विनोदाने संपूर्ण उपस्थितांना खदखदून हसवले. कार्यक्रमात परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने पारंपरिक पालखी सोहळ्यात सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.यादरम्यान पैठणी मानकरी विजेत्यांची यादी कार्यक्रमात विविध स्पर्धांमधून बाजी मारणाऱ्या विजेत्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रथम क्रमांक (मानाची पैठणी): सौ. स्नेहल परकाळे (प्रायोजक: सुरेश बापू परकाळे, स्वराज फर्निचर)द्वितीय क्रमांक (टेबल फॅन): सौ.अनिता चव्हाण (प्रायोजक: विजय भैया परकाळे, युवा उद्योजक)तृतीय क्रमांक (कुकर): सौ. संध्या खोमणे (प्रायोजक: विलास परकाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष)चतुर्थ क्रमांक (इस्त्री): सौ. लता जाधव (प्रायोजक: अमर भैया सस्ते, सामाजिक कार्यकर्ते)पाचवा क्रमांक (चांदीचं नाण): सौ. आशा खोमणे (प्रायोजक: सर्फराज शेख, PCS कंपनीचे सर्व सर्वे )सर्व विजेत्या महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सचिन कुचेकर, लक्ष्मण परकाळे, ऋषिकेश कुचेकर,माऊली मोटे,शंतनू चव्हाण,कुणाल सकट,स्वप्निल कुचेकर,हर्षु मोटे,ओंकार कुचेकर, अथर्व मोटे व इतर सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.धार्मिक व सांस्कृतिक सोहळा नवरात्रोत्सवा दरम्यान विविध धार्मिक विधी आणि नऊमाळांचे आरती मानकरी खालीलप्रमाणे लाभले.घटस्थापना (पहिला दिवस): दादा कुचेकर (माजी उपाध्यक्ष, तंटामुक्ती समिती).दुसरी माळ: सुदाम कुचेकर व सुदाम भाऊसाहेब परकाळे (माजी सरपंच), नामदेव मामा परकाळे (माजी उपसरपंच)तिसरी माळ: जालिंदर जमदाडे व बबलू वायसेचौथी माळ: महेश मोटे व अरविंद आबा परकाळेपाचवी माळ: वैभव मोटे व वंदनाताई परकाळे (सरपंच).सहावी माळ: विजय भैया परकाळे व भगवान मोटे.सातवी माळ: दिगंबर परकाळे व बिरजू भैय्या मांढरे (उपनगराध्यक्ष).आठवी माळ: राजू चव्हाण व राजू वायसे (तंटामुक्ती अध्यक्ष).नवी माळ: जालिंदर वायसे (उपसरपंच) व हनुमंत मामा वायसे.दहावी माळ: बाळासाहेब कुचेकर.उत्सवाच्या रात्री बारा वाजता सौ. प्रतिभा काकी दिलीप दादा परकाळे (संचालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती) यांच्या हस्ते होम प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.देवीची भव्य मिरवणूक आकर्षक रांगोळ्या,सुंदर फटाक्यांची आतषबाजी आणि हलगी-मृदुंगाच्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
No comments:
Post a Comment