जुन्नर-लाच घेतल्या प्रकरणी नुकताच एक बातमी व्हायरल झाली महसूल विभागात खळबळ माजवणारी ही बातमी असून यामध्ये आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गोविंद शिंदे (वय 46) यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो (ACB), पुणे पथकाने शुक्रवारी (27 मार्च) रंगेहात पकडले.तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी नारायणगाव येथे इमारत बांधकामासाठी अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आवश्यक 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळूनही प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता. 20 मार्च रोजी चौकशीसाठी गेले असता शिंदे यांनी प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने 24 मार्च रोजी ACB पुणे येथे तक्रार दाखल केली.पडताळणीदरम्यान 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीदरम्यान 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 27 मार्च रोजी मंचर येथील उपविभागीय
कार्यालयात सापळा रचण्यात आला. दुपारी 3.03 वाजता तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारताना शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ACB करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान, गोविंद शिंदे हे यापूर्वी शिर्डी येथे
प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अटकेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी लाचेची मागणी झाल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment