बारामतीत ५० हजार रुपयांचा गंडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तरूणाकडून अवघ्या १५ मिनिटांत संपुर्ण रक्कम परत मिळवून देण्याचे सर्वश्रेय बारामती शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी साहेब व त्यांचे सहकारी यांनाच..
बारामती :-येथील इंदापूर चौकातील सिनेमा रोड नगरपरिषदेच्या गाळ्यातील गाळ क्र.१ मध्ये युनिक मोबाईल शॉपी नावाचे दुकान अरबाज तांबोळी व अभिमन्यू (मुन्ना) शिंदे हे दोघे तरुण मोबाईल दुरुस्ती, ॲक्सेसरीज, तसेच अधिकृत मनी ट्रान्स्फर चा व्यवसाय प्रामाणिकपणे चालवतात परंतु दिंनाक २७/३/२०२६ वार शुक्रवारी दुपारी ३ वाजता युनिक मोबाईल शॉपी दुकानात एक तरूण व त्याचे वडील काउंटरवर आले आणि म्हणाले कि आम्हाला एक लाख साठ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करायचे आहेत..
दुकानदार अभिमन्यू (मुन्ना) शिंदे याने त्या तरूणानाने सांगितलेल्या अकाउंटवर ५०,०००/- पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर केले
उर्वरित रक्कम सुद्धा अभिमन्यू (मुन्ना )शिंदे त्या तरूणाला म्हणाले मी टाकतो..
प्रथम मला पहिले ट्रान्सफर केलेले 50 हजार रुपये द्या असे म्हणाल्यावर तो तरूण म्हणाला कि माझे शेअर ट्रेडिंग चे अकाउंट आहे तुम्ही अजून एक लाख दहा हजार रुपये त्याच खात्यात टाका म्हणजे मला अर्ध्या तासाने चार लाख रुपये शेअर ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट्सह मिळतील मग मी तुमची 50 हजारासह सर्व रक्कम परत देतो...
अभिमन्यू शिंदे यांना संशय आला कि हा तरुण काहीतरी खोटे बोलत आहे...
तोपर्यंत त्याचे वडीलही तिथून निघून गेले ....
तब्बल दुपारी ३.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यत तो तरूण काहीच थांगपत्ता लागू देत नव्हता मग अभिमन्यू शिंदे यांनी माझ्याशी संपर्क करून मला बोलावून घेतले तेथे मी आल्यावर त्या तरूणाकडून माहिती घेऊन तो ज्या गावी राहत असल्याचा पत्ता सांगत होता. तेथील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर पोलीस पाटील यांनी सुद्धा त्या तरूणांच्या कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क केला परंतु पोलिस पाटील यांनासुध्दा फोनवर नातेवाईक व तो तरूण उडवाउडवीची उत्तरे देत होते सदरची रक्कम देण्यास असमर्थता दाखवू लागले आणि नातेवाईकच म्हणू लागले कि तो शेअर ट्रेडिंगचे काम करतो
तुम्ही आधी त्याच्याकडून रक्कम का नाही घेतली.? तुम्ही अजून पैसे टाका म्हणजे आमच्या मुलाला शेअर्स ट्रेडिंगमधून प्रॉफिटचे पैसे येतील मग देऊ
आता लक्षात आले हा कि तरूण शेअर्स ट्रेडिंगमधून लोकांचे पैसे गुंतवून फसवतोय त्याच्या गावच्या पोलिस पाटील यांच्या मार्फत नातेवाईकांशी संपर्क करून चार-पाच तास झालेतरी तो व त्याचे नातेवाईक रक्कम परत करत नाहीत...
हे लक्षात आल्यावर सामाजिक कार्यकर्ते मुनिर तांबोळी यांनी त्या तरूणाला व युनिक मोबाईल शॉपीचे अभिमन्यू शिंदे व अरबाज तांबोळी त्यांचे मित्र विशाल भोसले यांना घेऊन बारामती शहर पोलिस स्टेशनला गेले तिथे तात्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या कानावर सदरचा प्रकार घातला असता त्यांनी त्या तरूणाला विचारणा केली कि तु अस का केले किती दिवासापासून तू शेअर ट्रेडिंगचे काम करत आहेस तु यामध्ये किती रक्कम स्वतःची इन्व्हेस्ट केली आहे तुला शेअर ट्रेडिंगचा अनुभव किती आहे तुझे प्रॉफिट किती आहे श्रीशैल चिवडशेट्टीसाहेब यांनी त्यांच्या असलेल्या अनुभव व माहीतीच्या आधारे शेअर ट्रेडिंगचे संदर्भातील विविध प्रश्न त्याला विचारले त्यांच्या लक्षात आले कि सदरचा तरूण हा कमी कष्टात जास्त पैसे कमविण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबत आहे त्यांनी त्याला समज देत पोलीसी खाक्या दाखवला असता त्याचे नातेवाईकांशी पोलिस निरीक्षक. श्रीशैल चिवडशेट्टी साहेब संपर्क करून तुमचा नवतरूण मुलगा अश्या कृत्यामुळे कायदेशीर गुन्हेगार ठरेल असे ठणकावून सांगितले त्यानंतर त्या तरूणांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या इतर नातेवाईकांशी संपर्क करून सदरची ५० हजार रुपयांची रक्कम मुळ दुकानदार अभिमन्यू(मुन्ना) शिंदे यांना अवघ्या १५ मिनिटात ऑनलाइन पाठवून दिली...
योग्य पद्धतीने तत्परतेने कर्तव्यदक्षता दाखवत बारामती शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी साहेब यांनी सदरील प्रकरण योग्य प्रकारे हाताळल्यामुळे अवघ्या १५ मिनिटात ५० हजार रुपये दुकानदार अभिमन्यू (मुन्ना) शिंदे यांना मिळाली...
श्रीशैल शिवडचिट्टीसाहेब व पोलीस उपनिरीक्षक श्री.सजंय जाधवसाहेब यांचे सर्व सहकारी अमीर शेख, महेश माने , बाजीराव गर्जे पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी या कृतीतून दाखवून दिले कि पोलीस प्रशासन हे बारामतीकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, व न्यायासाठी कटीबद्ध आहेत...
No comments:
Post a Comment