बारामती :- दि.८ जुन २०२६ रोजी २०/३० वाचे सुमा मौजे माळेगाव खुर्द, ता. बारामती जि.पुणेगावचे हद्दीत माळेगाव ते कऱ्हावागज रोडवरील तुकाई चौक येथिल बंद पत्राशेडचे गाळयांसमोर आरोपीनामे मयुर विष्णु मोरे रा.मेडद ता. बारामती जि. पुणे याच्याकडून खरेदी करून आरोपी नामे गणेशतात्याराम गावडे वय - २० वर्षे रा. कऱ्हावागज ता. बारामती जि. पुणे हा त्याच्या ताब्यात अंगावर एकगावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस व कुकरी चाकू असे विनापरवाना, बेकायदेशीरपणे अज्ञातकारणाकरीता जवळ बाळगताना MH-42-AX-4428 या चार चाकी गाडीसह मिळुण आला होता त्यावेळीत्यांच्यावर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५० / २०२६ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम३/२५, ५/२५ व ४ / २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये गुन्हाकरून त्यांना अटक करण्यात आले होते.सदर गुन्हयाच्या तपासामध्ये अटक आरोपी गणेश तात्याराम गावडे व मयुर विष्णु मोरे यांच्याकडेतपास करता आरोपी गणेश तात्याराम गावडे याचे समक्ष गणेश दत्तात्रय काशीद सरपंच मेडद ता.बारामती जि.पुणे व सुजित निलेश नाळे रा. कऱ्हावागज ता. बारामती जि.पुणे यांच्यामध्ये अल्पवयीन मुलाकरवे मेडद येथिल अभिजित अर्जुन यादव यास जिवे ठार मारण्याबाबत चर्चा झालेली असून गणेशगावडे याची जमीन विक्री करून त्याच्याकडून ८ लाख रूपयांचा चेक मयुर विष्णु मोरे यास दि.०४/०६/२०२६ रोजी दिला असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर अटक आरोपी मयुर विष्णु मोरेयाच्याकडे तपास करता सदरील चेक पी.डी.सी.सी बॅक शाखा कसबा, बारामती येथे देवून ८ लाखरूपयांची रोख रक्कम गणेश काशीद याच्या सांगणेवरून घेवून त्यातील ३ लाख रूपये गणेश काशीदयाचे घरी देवून खंडोबानगर बारामती येथे पेट्रोल पंपाजवळ गणेश काशीद याने त्याच्या फॉरच्युनरगाडीमध्ये बसलेल्या सुजित नाळे यास ५ लाख रूपये देण्याचे सांगून मयुर विष्णु मोरे याने ५ लाखरूपये सुजित नाळे यास दिले व पैसे दिल्यानंतर गणेश काशीद याने सुजित नाळे यास दोन गावठीपिस्टल दिले व 'अभि यादव वाचता कामा नये' असे सांगून पोरांच्या वयाची परत एकदा खात्री करूनते अल्पवयीन आहेत हे बघून घे असे सुजित नाळे यास सांगितल्याने निष्पन्न आरोपी नामे गणेशदत्तात्रय काशीद व साक्षीदार अर्जुन शंकर यादव रा. मेडद ता. बारामती जि.पुणे यांच्यामध्ये राजकियवैमनस्य असून गणेश दत्तात्रय काशीद व सुजित निलेश नाळे यांनी अभिजित अर्जुन यादव रा. मेडद ता.बारामती जि. पुणे याचे खुनाचा कट करून गणेश दत्तात्रय काशीद याने खुना करीता ५ लाख रूपये वदोन गावठी पिस्टल सुजित निलेश नाळे यास दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयामध्ये गणेश दत्तात्रयकाशीद रा. मेडद ता. बारामती जि. पुणे व सुजित निलेश नाळे रा. कऱ्हावागज ता. बारामती जि.पुणे यांचासक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयामध्ये १२ जुन २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ६१ (२) सह १०३ r/w ५५ अशी कलम वाढविण्यात आली सदरची बाब आरोपी गणेशदत्तात्रय काशीद, विद्यमान सरपंच मेडद ग्रामपंचायत यास समजताच त्याने पालायन केले. तो वारंवारपोलीसांना गुंगारा देत अटक चुकवित पळत असताना अखेर त्यास दि.२३/१०/२०२६ रोजी १५/००वा. अटक करण्यात माळेगाव पोलीसांना यश आले आहे.अटक आरोपी गणेश दत्तात्रय काशीद याचे विरूध्द यापुर्वी खूनाचा प्रयत्न तसेच खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण १३ गुन्हे दाखल असून त्याची पोलीस कस्टडी घेवून गुन्हयाचा पुढीलअधिक तपास चालू आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण श्री. संदिपसिंह गिल्ल., अपर पोलीसअधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम . यांचे मार्गदर्शनाखालीआम्ही सपोनि कुलदिप संकपाळ तसेच पोलीस उपनिरीक्षक, देविदास साळवे, पोलीस अंमलदार अमोलवाघमारे, ज्ञानेश्वर मोरे, श्रीकांत माने या अधिकारी व अंमलदार यांनी उपरोक्त उत्कृष्ट कामगिरी बजावलीआहे.
Post Top Ad
Saturday, October 24, 2026
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत सुपारी देऊन खुनाचा कट रचल्याचा आरोप; चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सरपंच जेरबंद..
बारामतीत सुपारी देऊन खुनाचा कट रचल्याचा आरोप; चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सरपंच जेरबंद..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment