बारामतीत हॉटेल लॉज वर बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसाय करत असल्याने कारवाईची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 1, 2026

बारामतीत हॉटेल लॉज वर बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसाय करत असल्याने कारवाईची मागणी...

बारामतीत हॉटेल लॉज वर बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसाय करत असल्याने कारवाईची मागणी...                                                               बारामती :- बारामतीत नुकताच उपविभागीय पोलीस अधिकारी (dysp ) बारामती शहर ता.बारामती यांना निवेदन देण्यात आले यामध्ये बारामती शहर व तालुक्यातील अनेक हॉटेल लॉज वर बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसाय करत असून कार्यवाही होण्या बाबत लेखी निवेदन दिले आहे,बारामती शहर तालुक्यातील अनेक हॉटेल लॉज वर बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसाय करत असून हा व्यवसाय अनधिकृत रित्या चालू असल्याचे कळतंय मध्यंतरीच्या काळात पुणे,अहिल्यानगर परिसरात अनेक बांगला देशी व्यवसाय करणाऱ्या मुलीचा घात पात झाल्याच्या घटना घडल्या आहेत,आपली बारामती हे आदर्श शहर आहे आणि आपल्या बारामती वा बारामती तालुक्यातील अनेक हॉटेल्स  लॉजिंग मध्ये बांगलादेशी तरुणी आणून वेश्या व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे, पोलीस अधिकारी यांच्या कारकिर्दीत जर असे अनुसूचित प्रकार घडत असतील तर ही अशोभनीय बाब आहे आपण त्वरित अशा हॉटेल व लॉजिंग वर कार्यावाईचे आदेश द्यावेत पोलीस प्रशासनाचे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री  यांचे  लक्ष वेदन्या साठी कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने अश्या गैर प्रकारे वेश्या व्यवसाय करत असलेल्या हॉटेल आणि लॉज च्या समोर आंदोलन करण्यात येईल त्याच बरोबर ज्या ठिकाणी हे व्यवसाय चालू आहेत त्यांना नक्की वलयं कोणाचे आहे हे कळत नाही भिगवण रोड व MIDC हद्दीत वेश्या व्यवसायचा धुमाकूळ चालू आहे असून योग्य ती कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन फेसबुक. इंस्टग्राम. You tube वर सर्व काळे धंदे लाईव्ह करण्यात येतील आणि वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदय यांच्या सोशल मीडियाला पाठवण्यात येतील असे ही निवेदनात म्हंटले आहे.आपल्या बारामतीचे पोलीस महाराष्ट्रात अतिदक्ष व चांगले काम करतआहे,फक्त आपल्या बारामती मधून वेश्या व्यवसायची पाळे मुळे उपटून टाकावीत पुढील अंकात ज्या ज्या हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालू आहे त्यांची सगळे व्हिडीओ फोटो व हॉटेलची नावे प्रसारित करण्यात येणार आहेत आणि येत्या दोन दिवसात उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.हे निवेदन सन्नी काकडे,महादेव गायकवाड, सुरज भैलुमे,अमर झेंडे यांनी  दिले आहे

No comments:

Post a Comment