पोलिसांची ऑनलाइन जुगारावर अड्डयावर छापा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 2, 2026

पोलिसांची ऑनलाइन जुगारावर अड्डयावर छापा..!

पोलिसांची ऑनलाइन जुगारावर अड्डयावर छापा..!
वडगाव निंबाळकर :- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून,होळ
रोडवरील एका पत्रा शेडमध्ये सुरु असलेल्या ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला
ताब्यात घेऊन 11,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, मौजे वडगाव निंबाळकर गावच्या हद्दीत होळ रोडलगत असलेल्या एका पत्रा शेडमध्ये
'फनटार्गेट' नावाचा ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणी श्रीकांत केलार शेलार (वय 35 वर्षे, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून
खालील मुद्देमाल जप्त केला आहे, यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू: तोशिबा कंपनीचा मॉनिटर,जेब्रॉनिक्स कंपनीचा सी.पी.यु. आणि की-बोर्ड.
तसेच रोख रक्कम: भारतीय चलनी नोटांसह एकूण 1,770 रुपये रोख व इतर जुगाराच्या नोंदी असलेली
वही आणि पेन असे एकूण जप्त माल: 11,090 रुपये.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आबा विलास जाधव यांनी फिर्याद
दिली असून, आरोपीविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट बारामती येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात
सादर करण्यात आला आहे.
सदर कारवाईची नोंद पोलीस
ठाण्यात करण्यात आली असून,पुढील तपास पोलीस हवालदार पोपट नाळे हे करत आहेत. या कारवाईमुळे अवैध ऑनलाइन जुगार चालवणाऱ्यांचे धाबे 
दणाणले आहेत.वडगाव निंबाळकर पोलीस
स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही
प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत.असे पोलिसांनी आवाहन केले,ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून तरुण
पिढीची दिशाभूल करणाऱ्या
केंद्रांवर आमचे विशेष लक्ष आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही
ही कारवाई केली असून, यापुढेही
अशा प्रकारचे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.असे नागरिकांना आवाहन करण्यात आले.आपल्या परिसरात असे अवैध
प्रकार सुरू असल्यास त्वरित
पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.असेही यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment