पुणे:- बारामतीतील एका प्रसिद्ध उद्योगपतीने
एका एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर अनेक ठिकाणी नेत लैगिंक शोषण केलं असल्याचे प्रसार माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या याबाबत मिळालेली माहिती अशी की,पुणे येथे एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर वारंवार वेगवेगळ्या हॉटेल, लॉजवर लैगिंक शोषण झाल्याचे कळतंय, याबाबत पुणे शहरातील उद्योगपतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लैगिंक शोषण प्रकरणात नामांकित उद्योगपती मनोज तुपे हा बारामती शहरात राहत असल्याचे कळतंय, पीडितेच्या माहितीवरून मनोज तुपेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 15
ऑक्टोबर रोजी घडली.पीडितेच्या तक्रारीनुसार, 2020 मध्ये, पीडितेनं तिचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, तिने पुण्यात शिक्षण घेतलं आणि ती तिथेच राहायला गेली. याच काळात, 2021 मध्ये,पीडितेची बारामतीत आरोपी मनोज तुपेशी भेट झाली. या काळातच त्याने पीडितेचा मोबाईन फोन नंबर मिळवला आणि म्हणाला की, मी एक मोठा व्यापारी आहे आणि मी तुला आणि माझ्या मित्राला चांगली नोकरी मिळवून देईन. दोघेही फोनवर बोलत होते आणि त्यानंतर तरुणी ही शिक्षणासाठी पुण्याकडे गेली.तिच्या इच्छेविरुद्ध रेल्वे स्टेशनवरजवळील कारमध्ये लैंगिक शोषण केले,ऑगस्ट 2021 मध्ये, तुपेने पीडितेला जेवणासाठी बोलावले आणि हडपसर येथे सोडवण्याचे आश्वासन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध रेल्वे स्टेशनवरजवळील कारमध्ये लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर, आरोपीने तिला वारंवार पुण्यात काही हॉटेलमध्ये नेत लग्न करण्याचे आश्वासन देत तिचं लैंगिक शोषण केलं. पीडितेचं ऑक्टोबर 2022 मध्ये लग्न झाले होते, परंतु ऑगस्ट 2023 मध्ये तिने तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पीडिता ताणाखाली आपलं आयुष्य जगत होती. आरोपीने तिच्याशी संपर्क साधला आणि चल लग्न करूया, ब्रेकअप करायचा नाही, असे म्हणत त्याने पुन्हा पीडितेचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर
लग्नाचा विषय काढल्यानंतर आरोपी संतापू लागला आणि पीडितेशी वाद घालू लागला. आरोपीने पीडितेकडे लग्न करण्यास नकार दिला, समाजात माझी प्रतिष्ठा आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, पीडितेनं त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले
तेव्हा आरोपीने तिच्याशी वारंवार शीरिक संबंध ठेवले आणि तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली असल्याचे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते.
No comments:
Post a Comment