बारामती :- "दादा आज आपण असता तर आम्हाला न्याय मिळाला असता, पण आपल्या नसण्याने आम्हा कष्टकरी कामगारांवर अन्याय होतोय, याची दखल घेण्यासाठी कुणाकडे जायचं, आपण नसल्याची उणीव आम्हांला भासत आहे...." असे भावनिक प्रतिक्रिया बारामतीत अमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीने केले, याबाबत सविस्तर माहिती अशी की, युनायटेड स्पिरीट लि.अ-डॅजो ग्रुप पिंपळी बारामती (दारुची कंपनी)
पुणे या कंपनीचे जनरल मॅनेजरने ५ कामगारांना
बिनपगारी रजा केल्यामुळे २०२२ ते २०२३-२४ चे रेकॉर्ड काढून युनियन
प्रतिनिधींना हाताशी धरुन दि.२५/०२/२०२६ रोजी कामावरुन काढून
टाकण्याचे पत्र कंपनी गेटवर दु. ३ वा. दिले. त्यामुळे कामगारांवर झालेला
अन्याय दुर होणेबाबत सोमवार दि. ०२/०३/२०२६ पासून कंपनी गेटवर
'आमरण उपोषणास बसले असून आज 4 दिवस झाले या कडे लक्ष सुद्धा दिले नाही,
कंपनीत गेली ३० ते ३५ वर्षापासून काम करीत असून, मशिन ऑपरेटर हेमराज साहेबराव जगताप कंपनीत काम करीत असून, कंपनीने नेहमीच आम्हास सहकार्य केलेले असून, आम्ही देखील त्यांना सहकार्य केलेले आहे. त्यांनी कधीही आमचे विषयी टोकाची भुमिका ३०/३५ वर्षात घेतलेली नव्हती.
परंतू आता आलेले जनरल मॅनेजर युनायटेड स्पिरीट
4.लि. अ-डॅजो ग्रुप यांनी काही लिडरला हाताशी धरुन सदरच्या नोटीसा आम्हास काढून कामावरुन कमी केलेले आहे. पुर्वी कंपनीमध्ये रिलीव्हर सिस्टीमने बॉटलिंग विभागात
काम चालू होते, परंतू लिडरला लोकांना हाताशी धरुन काही लाईनच्या कामगारांना
26 कमी करुन कमी कामगारात काम करण्याची पद्धत चालू केली, त्याचा त्रास कामगारांना
होत आहे.दारुची फॅक्टरी असताना कामगारांना कंपनीत येताना व बाहेर जाताना 'तु दारु
पिलेला आहेस का? नाही' त्यास मशिन लावून चेक करत होते. अशाप्रकारे कामगारांना
दहशतीखाली ठेवून सदर अधिकारी काही लिडरला हाताशी धरून कामगारांना त्रास देत होते. आमचे कंपनीने बिगर परवानगीची रजा काढलेचे रेकॉर्ड सन २०२२ पासूनचे
काढलेले आहे व वारंवार आम्हाला त्या-त्या सालात रजा कमी दिलेल्या आहेत, त्यात हक्काच्या एसएल, सीएल, पीएल. रजा कमी दिलेल्या आहेत. तरी सुद्धा आम्हा ५ कामगारांना बिनपगारी सदराखाली कंपनीने कामावरुन काढलेले आहे.कंपनीत पुर्वी बॉटल बॉक्स (दारू) चोरी झालेली असताना तसेच कंपनीत अनेक वेळा भांडणे झालेली असताना, कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई कंपनीने त्यावेळी
केलेली नाही.आता आलेले साहेब हे काही लिडरला हाताशी धरून कामगार
कमी करण्याचे धोरण राबवित असून, मी खुप कडक आहे असे सांगून वारंवार 'मला
कामगारांची आता गरज नाही, मी कंत्राटी कामगारांकडून काम करुन घेईन, तुमची
मला गरज नाही" असे बोलून कामगारांना धमकावित आहेत.साहेब, आमची ५/७ वर्षाचीच सर्व्हिस राहिलेली असून, त्यानंतर आम्ही रिटायर होत आहोत, त्यानंतर आम्हाला योग्य तो मोबदला मिळेल परंतू अशाप्रकारे कारवाई केलेनंतर आम्हाला तो मोबदला मिळणार नाही. आम्ही सर्वजन आमच्या घरातील कर्ते असून, आमची मुले/मुली लहान असून त्यांचे शिक्षण चालू आहे व लग्न करायचे आहे.कंपनीने अशाप्रकारे आमचेवर कारवाई करु नये व केलेली कारवाई मागे घ्यावी यासाठी
आम्ही कंपनी गेट शेजारी सोमवार दि.०२/०३/२०२६ पासून "आमरण उपोषणास"
बसत आहोत. आमचे जीवीतास काही बरेवाईट झाल्यास त्यास सर्वस्वी कंपनीचे जनरल
मॅनेजर साहेब, एच. आर. आणि लिडर हे जबाबदार असतील कृपया नोंद घ्यावी.असे लेखी निवेदन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय,पोलीस अधिकारी,कंपनी ला दिले असून हे आम्हांला न्याय मिळेपर्यंत उपोषण चालू रहाणार असल्याचे उपोषण कर्ते हेमराज जगताप यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment