बारामती :- एका 52 वर्षीय नराधमाने स्वतःच्याच नात्यातील अवघ्या 12 ते 13 वर्षांच्या एका असहाय्य मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,या
अत्याचारातून ती कोवळी मुलगी गरोदर राहिल्यानंतर, प्रकरण अंगाशी येईल या भीतीने एका खाजगी रुग्णालयात तिचा बळजबरीने गर्भपातही करण्यात आला. या भयंकर घटनेने संपूर्ण बारामती तालुका हादरला असून,
समाजात संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी
हा पीडित मुलीच्या नात्यातीलच आहे. नात्याचा आणि मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत या नराधमाने अत्यंत कोवळ्या वयात असलेल्या या मुलीचा शारीरिक उपभोग घेतला.केवळ अत्याचार करून तो थांबला नाही, तर त्या लहान जीवाला सतत धमकावून त्याने हे कृत्य वारंवार केले. या अमानुष अत्याचारामुळे ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.गर्भधारणेपासून ते
गर्भपातापर्यंतच्या संपूर्ण काळात त्या चिमुकलीला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर अतोनात यातना सहन कराव्या लागल्या. प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल केले आणि तिचा गर्भपात घडवून आणला. याच गर्भपाताच्या घटनेनंतर हा सर्व भयानक प्रकार
उजेडात आला.ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला. संतप्त जमावाने या नराधमाला गाठून त्याला यथेच्छ चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या
घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत, कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून,पुढील तपास सुरु आहे.
No comments:
Post a Comment