'खंडुखैरेवाडी व शेरेवाडी गावचे हददीतुन चोरीस गेलेल्या टॉवर लाईन ॲल्युमिनीअमच्या तारासह आरोपी जेरबंद - सुपा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी'
बारामती:-बारामती तालुक्यातील गावात दिनांक ०४/०२/२०२६ रोजी १८:०० वा. ते दिनांक ०५/०२/२०२६ रोजी ०९:०० वा. चे दरम्यान मौजे खंडुखैरेवाडी येथील टॉवर क्रमांक १२४/० ते १२४ /२ तसेच शेरेवाडी येथील टॉवर क्रमांक
१२०/५ ते १२०/६ मधील ए एल ५९ झेब्रा कंन्डक्टर तार ०.६ कि मीटर प्रति ३६० रू. मीटर प्रमाणे तसेच ४.४ कि मीटर प्रति ३६० रू मीटर प्रमाणे असे एकूण १७,९९,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेलेबाबत सुपा पोलीस स्टेशनला दिनांक १६/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हा उघडकीस आणुन,गुन्हयाचे तपासकामी १) शिवशंकर मारूती हळदेकर वय २३ वर्षे हल्ली रा. मेदनकरवाडी चाकण ता.खेड जि.पुणे मुळ रा. इकळीमोर ता. नायगाव जि. नांदेड, २) मोहणसिंग धनसिंग राजपुत वय ३६ वर्षे रा. केसनंद वाघोली ता. हवेली जि. पुणे मुळ पत्ता मुपो. कन्होजा तहसिल- कुम्बलगड जि. राजसमन राज्य. राजस्थान. ३) सुरज राजु
गिरम उर्फे सुरज डोंगरे वय २१ वर्ष रा. मेदनकरवाडी चाकन ता.खेड जि.पुणे मुळ रा. फुलारवाडी पोस्ट वाघाळा ता पाथरी जि.परभणी, ४) कलाम अब्दुल हमीद खान सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे मुळ रा. पिडवा पो. असनार
तहसील बासी जि.सिदधार्थनगर उत्तरप्रदेश, ५) अर्जन श्रीराम यादव सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे मुळ रा.माधवपुर ता. तुळशीपुर जि.बलरामपुर उत्तरप्रदेश यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन गुन्हयातील गेले
मालापैकी १३,४९,८७५/- रू. चा माल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने महिंद्रा कंपनीची बलोरो मॅक्स एक्स पिकअप नंबर एम. एच. १४ के. ए. ९४२९ व पल्सर मोटार सायकल नंबर एम. एच २६ डि. ए.२१८५ अशी वाहने जप्त करण्यात आलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, मा. सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक मनोजकुमार नवसरे, सहा. पोलीस निरिक्षक प्रकाश पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरिक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार
- संतोष पवार, महेंद्र गायकवाड, रूपेश साळुंखे, पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंखे, भाउसाहेब चौधरी, चालक सोमनाथ होले यांनी सहभाग घेवुन उत्कृष्ट तपास केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार संतोष पवार हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment