बारामती येथील गोदामामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे ताळेबंद- उत्तम दिघे.
बारामती(रामायण धर्माधिकारी):- बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीत २३ एप्रिल २०२६ रोजी ४७८ मतदान केंद्रांवर मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसी, बारामती येथे निवडणूक निरीक्षक, उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छायाचित्रणासह सुरक्षितपणे ताळेबंद करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या साठवण व सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्ट्राँग रूमसाठी दुहेरी स्तराची सशस्त्र सुरक्षा तसेच २४x७ सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था करण्यात आली आहे. राखीव ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रेदेखील त्याच ठिकाणी स्वतंत्र राखीव स्ट्राँग रूममध्ये निर्धारित सुरक्षा नियमांनुसार साठवण्यात आली आहेत.
सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्राँग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांना अंतर्गत सुरक्षा परिघाच्या बाहेर थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही प्रदर्शनाची व आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment