*धक्कादायक...अजितदादाच्या घरासमोर अघोरीं पूजा,बोकड उलटं टांगलं..अजितदादांच्या विमान अपघाताआधी अघोरी प्रकार..?पोस्टने खळबळ.* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 23, 2026

*धक्कादायक...अजितदादाच्या घरासमोर अघोरीं पूजा,बोकड उलटं टांगलं..अजितदादांच्या विमान अपघाताआधी अघोरी प्रकार..?पोस्टने खळबळ.*

धक्कादायक...अजितदादाच्या घरासमोर अघोरीं पूजा,बोकड उलटं टांगलं.. अजितदादांच्या विमान अपघाताआधी अघोरी प्रकार..? पोस्टने खळबळ.
बारामती:-नुकताच प्रसिद्धी माध्यमातून बातमी समजली राष्ट्रवादीचे आमदार अमोल
मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन अघोरीं विद्या तर नाही ना, म्हणत प्रश्न उपस्थित केले होते. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी यांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी विद्या प्रतिष्ठान एआय इमारत बांधकामजवळ मध्यरात्री मांडलेली अघोरी पूजा मांडल्याची माहिती देत फोटो देखील शेअर केले आहेत, त्याचबरोबर दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते त्याआधी रात्री अशी अघोरी पूजा मांडल्याचं बोललं जात आहे. 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ मध्य रात्री मांडलेली ही अघोरी पूजा मांडली असे सांगितलं,दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते.असे  अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मिडीयावरती दोन पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आणि फोटो शेअर केला आहे. अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय की,
'बारामती मध्ये सहयोग मधील घर, काटेवाडीतील घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणार्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले
जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही, अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेंत.डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ ही अघोरी पूजा मध्य रात्री मांडली होती आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते', अशी माहिती अमोल मिटकरींनी
पोस्ट केली आहे. बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा तर आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय की, खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य ??? दिसलें होते. असं सांगितले.

No comments:

Post a Comment