बारामती येथे पोस्टल पेन्शन अदालतीचे आयोजन..
पुणे, दि. २७: बारामती पोस्टल विभागाअंतर्गत येणाऱ्या पोस्टल पेन्शन संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी विभागीय स्तरावर ४ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता "पोस्टल पेन्शन अदालत" चे आयोजन करण्यात आले आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, टपाल विभागाचे सेवानिवृत्त तसेच सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेले अधिकारी व कर्मचारी, टपाल विभाग, बारामती येथील निवृत्तीधारक ज्यांचे ३ महिन्याच्या आत निपटारा झालेले नाही अशी प्रकरणांवर डाक पेन्शन अदालतीमध्ये कार्यवाही केली जाणार आहे.
पेन्शन अदालतमध्ये नितिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार आदी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार नाही. ज्या तक्रारींची दखल पूर्वीच्या पेन्शन अदालीद्वारे घेण्यात आलेली आहे अशा तक्रारीचा पुन्हा पेन्शन अदालतीमध्ये समावेश करता येणार नाही. याबाबत नोंद घ्यावी. पुर्वीच्या पेन्शन अदालतीमध्ये ज्या तक्रारींचे दखल घेतली गेलेली नसेल अशा प्रकारच्या तक्रारीचा यात समावेश होऊ शकेल. एका तक्रार धारकाकडून एकच तक्रार लेखी स्वरूपात येणे आवश्यक आहे.
निवृत्तीवेतनधारक विहीत प्रपत्रामध्ये आपले अर्ज अधीक्षक डाकघर, बारामती विभाग, बारामती मुख्य टपाल कार्यालय इमारत, बारामती ४१३१०२ यांच्याकडे ३० एप्रिल २०२६ अखेर पाठवावे, विहीत मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार पेन्शन अदालतीमध्ये केला जाणार नाही, अशी माहिती बारामती मंडळाचे अधीक्षक डाकघर केतन शित्रे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment