*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ*

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ*
*शिबीरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी घेण्याचे आवाहन* 

बारामती, दि. ४:  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून ७ मार्च रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे, या शिबीरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे. 

महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यातबाबत मंजुरी दिलेली आहे. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी अभियानाचा टप्पा क्रमांक एक बारामती व इंदापुर तालुक्यात राबविण्याबाबत कविवर्य मोरोपंत नाटयगृह बारामती येथे सभा घेवून मार्गदर्शन केले. 

यावेळी बारामती व इंदापुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. 
महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबधित दैनंदिनी प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करणेसाठी मंडळ स्तरावर  समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

यामध्ये प्रामुख्याने  ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशनकार्ड वाटप, सामाजिक लाभांच्या योजना (संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना), प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त पत्रके तयार करणे, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्राचे वाटप आदीबाबत सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी निर्देश दिले आहेत. 

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ चे वेळापत्रक*

काटेवाडी येथून ७ मार्च रोजी प्रांरभ होणार असून शिर्सुफळ येथे १४ मार्च, करंजेपुल २० मार्च, पणदरे २७, वडगाव निंबाळकर ३ एप्रिल, मोरगाव १० एप्रिल, लोणीभापकर १७ एप्रिल, सुपा २४ एप्रिल, बारामती ८ मे, माळेगाव बु.१५ मे आणि उंडवडी क.प.२२ मे  रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे,अशी माहिती तहसिलदार श्री. रावडे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment