मंचर येथून २० वर्षीय महिला बेपत्ता - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

मंचर येथून २० वर्षीय महिला बेपत्ता

मंचर येथून २० वर्षीय महिला बेपत्ता
----------------------------------------
आंबेगाव (पुणे )प्रतिनिधी कैलास गायकवाड:-ता.२४ मंचर ता. आंबेगाव जि. पुणे येथून २०वर्षीय महिला बेपत्ता झाली असल्याची घटना २३मे रोजी दुपारी दोन वाजतास घडली आहे.
पुजा तपन गायन (२०)वर्ष रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. या बाबत तिचा पती तपण निमाय गायन याने मंचर पोलीस ठाण्यात मिसींग तक्रार दिली आहे.या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तपन निमाय गायन (२९)वर्ष हा त्याची पत्नी बरोबर मंचर येथे राहण्यास असून त्याना १वर्षाचा मुलगा आहे. दि.23मे रोजी फिर्यादी कामावर गेले असता त्याला दुपारी त्याचे शेजारी नईफ तांबोळी यांनी फोन करून सांगितले की तुझी पत्नी तुझा मुलाला आमच्या कडे ठेऊन मी पती बरोबर शॅपिंग ला जाते असे सांगून निघून गेली आहे. बराच वेळ झाला ती आली नाही व मुलगा खुप रडत आहे. तुम्ही लवकर घरी या असे सांगितले.त्या नंतर फिर्यादीने तिला फोन लावला असता फोन बंद लागत होता. नंतर पतीने आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्याने मंचर पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
.[बेपत्ता महिलेचे वर्णन खाली प्रमाणे आहे
नाव -पूजा तपन गायन (२०वर्ष )अंगाने सडपातळ, उंची ५फूट, चेहरा गोल, रंग गोरा अंगात निळ्या रंगाची जीन्स, काळ्या रंगाचा टॉप, भाषा मराठी, हिंदी, बंगाली, असामी बोलते.]

No comments:

Post a Comment