अरे बापरे.. मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीच्या पार्श्वभागावर नराधमाने चक्क चापट मारली..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 24, 2022

अरे बापरे.. मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीच्या पार्श्वभागावर नराधमाने चक्क चापट मारली..!

अरे बापरे.. मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीच्या पार्श्वभागावर नराधमाने चक्क  चापट मारली..!
       पुणे:- महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचे आणखी एक उदाहरण पुढे आले आणि तेही चक्क महिला डॉक्टर वरच प्रसंग ओढवतो, पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीसोबत लज्जास्पद प्रकार,नराधमाने चक्क पार्श्वभागावर चापट मारली हा प्रकार पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका 29 वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग केल्याची
घटना समोर आली आहे. पुण्यातील बी जे
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला आहे. ही तरुणी प्रवेशद्वारातून जाताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करुन तिचा विनयभंग केला.याबाबत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा  दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी
डॉक्टर असून रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या
सुमारास त्या बीजे महाविद्यालयाच्या
प्रवेशद्वारातून जात असतानाच आरोपी
दुचाकीवरुन त्या ठिकाणी आला. त्याने काही
समजण्याच्या आत त्याने डॉक्टर तरुणीच्या
पार्श्वभागावर चापट मारली आणि पळून गेला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी
घाबरली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव
घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी
आरोपीविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा
दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक
जाधव करीत आहेत.

No comments:

Post a Comment