प्रेमी युगलाला कोयत्याने मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी केली अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 3, 2026

प्रेमी युगलाला कोयत्याने मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी केली अटक..

बारामती:-नुकताच सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्याला अटक करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीआहे. आरोपींकडून 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.26फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8.40 वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगतअसलेल्या एलसी कंपनी येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव)(मूळ राहणार नागपूर वय 26, हल्ली बारामती)हे त्यांच्या मैत्रिणी सोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर, कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे 21 ग्रॅम वजनाची चैन(किंमत 3 लाख रुपये), चांदीची अंगठी (5 हजार रुपये), चांदीची चैन (15 हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (2 हजार रुपये) व 2 हजार रुपये रोख असा एकूण 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व'परत इकडे यायचं नाही' अशी धमकी देत तेथून पसार झाले.याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात येथे बी.एन.एस कलम 309 (6),3 (5) अन्वये दाखल करण्यात आला आहे.गोपनीय माहितीवरून तपासादरम्यान प्रसाद गणपत भोसले वय 24 धैर्यशील प्रशांत आगवणेवय 19 व कृष्णा नाना गाडेकर वय 21 (सर्व रा. तांदुळवाडी, ता.बारामती) यांना 28 फेब्रुवारीरोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचे युवराज पाटील,अंमलदार सुरेंद्र वाघ,भारत खारतोडे,मनोज पवार,जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांच्यापथकाने केली.

No comments:

Post a Comment