तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय मधील बी.काॅमच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 3, 2026

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय मधील बी.काॅमच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय मधील बी.काॅमच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..
13 वर्षानंतर उजळल्या महाविद्यालयीन आठवणी

बारामती:-तुळजाराम चतुरचंद महाविद्याल, बारामती मधील बी.काॅम 2012-2013 उत्तीर्ण बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 13 वर्षांनंतर एकत्रित येत स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.हा गेट-टुगेदर कार्यक्रम आर्याबाग,काटेवाडी (ता.बारामती) येथे रविवार दिनांक.1/3/26 रोजी आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपापला अल्पपरिचय वजा मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातून बी.काॅम उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी,सीए,पत्रकार, पोलीस,वकील, व्यावसायिक,उद्योजक, शिक्षक,खेळाडू,प्रगतशील बागायतदार अशा विविध क्षेत्रात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला नावलौकिक करत असल्याचे दिसून आले.या स्नेहमेळाव्यात बॅचमधील 125 ते 130 विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.13 वर्षांच्या दीर्घकाळानंतर सर्वजण एकत्रित आल्यामुळे वातावरणात आनंद,उत्साह आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक रंग भरला होता. महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी,सांस्कृतिक कार्यक्रम,अभ्यासातील अनुभव तसेच त्या काळातील काॅलेजचे किस्से यांची मनमोकळेपणाने देवाणघेवाण करण्यात आली.अनेक वर्षांनी पहिल्यांदाच सगळे एवढे मनमुराद हसले. कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, खेळ तसेच चविष्ट स्नेहभोजनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.काही विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरी, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील प्रवासाविषयी माहिती देत एकमेकांना प्रेरणा दिली.सर्वांनी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन माजी विद्यार्थ्यांच्या समितीमार्फत करण्यात आले होते.त्यामध्ये स्वाती ताम्हाणे,नितेश शर्मा यांनी पुढाकार घेऊन सर्वांना एकत्रित आणत आयोजनाचा कार्यभार पाहीला.सर्वांच्या सहकार्यामुळे स्नेहमेळावा यशस्वीपणे पार पडला. शेवटी एकमेकांसोबतच्या आठवणी कॅमेर्‍यात कैद करून लवकरच भेटण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment