बारामती :-बारामती शहरातील आमराईतील प्रभाग क्र. 14 मधील कोअर हाऊस येथील अंतर्गत रस्ते करण्यात यावेत अशा स्वरूपाची लेखी मागणी दि. 6/3/2025 रोजी RPI (आठवले) पक्षाच्या वतीने बारामती नगर परिषदेकडे करण्यात आली त्याकरिता वारंवार पाठपुरावा देखील करण्यात आला होता. सदर
मागणीच्या अनुषंगाने निविदा प्रसिद्ध करून कामाचा आदेश देण्यात आला असून आज रोजी सदर कामास नारळ फोडून प्रत्यक्षात सुरुवात
करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रविंद्र सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा) सुनील शिंदे (सचिव प.महाराष्ट्र), रत्नप्रभाताई साबळे (म.उपाध्यक्ष प.महाराष्ट्र) संजय वाघमारे
( तालुका अद्यक्ष) मोईन बागवान, गणेश मागाडे, अनुराग कीर्तिकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. सदर रस्त्याची मागणी
मान्य करीत प्रत्यक्षात रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने सचिन सातव (नगराध्यक्ष बारामती शहर), अमर धुमाळ (सभापती बांधक
विभाग), पंकज भुसे (मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद) यांचे आभार मानत उर्वरित रस्त्यांच्या कामासहित विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामाकरिता बारामती नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येईल असे रविंद्र सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment