ग्रामीण भागातून कलाकार घडावेत-प्रमोद जाधव
बारामती(प्रतिनिधी):- ग्रामीण भागातील तरुण तरुणींमध्ये सूप्क्त कलाकार ओळखून त्यास घडविण्याचे काम केल्यास ग्रामीण भागातून कलाकार घडतील, असे उद्गागार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव यांनी काढले. संम्मेक मोशन पिक्चर्स संचलित प्रशिक फिल्म अकॅडमीच्या अॅक्टींग क्लास चे उद्घाटन प्रमोद जाधव यांच्या हस्ते बारामती क्लब मध्ये पार पडले, यावेळी ते बोलत होते .ते पुढे म्हणाले ग्रामीण भागातून कलाकार घडण्याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते ,असे म्हणून त्यांनी स्वतःचा शालेय जीवनामधील अनुभव कथन करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धेत मी भूमिका केलेल्या एकांकिकेला त्यावेळी ग्रामीण भागातून राज्यातून तृतीय क्रमांक तर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळालेला होता. परंतु जर त्यावेळी ग्रामीण भागातून अशा पद्धतीचे अॅक्टींग क्लासेस असते व मार्गदर्शन मिळाले असते तर आम्हीही मोठे कलाकार घडलो असतो. कलाकार न घडल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. माळशिरस तालुका पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांनी प्रशिक फिल्म अकॅडमी चे प्रमुख सचिन रणपिसे यांचे विशेष कौतुक करून त्यांनी ग्रामीण भागातील कलाकारांना विशेष ज्ञान देऊन कलाकार कसे घडतील याविषयी विशेष प्रयत्न करावेत असा सल्ला दिला .या कार्यक्रमाचे प्रमुख सचिन रणपिसे यांनी या अॅक्टींग क्लास मध्ये संभाषण कौशल्य, भाषण कौशल्य, कल्पनाशक्ती, वाचा शुद्धी ,यांसह चित्रपट ,वेब सिरीज, शॉर्ट फिल्म ,रिमिक्स सॉंग अल्बम ,याविषयी सखोल माहिती देऊन या अॅक्टींग क्लासमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग दर्शवावा अशे आव्हान केले. कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष विजय काकडे ,चित्रपट निर्माता दिग्दर्शक सिकंदर खान मुंबई, नाट्यदिग्दर्शक व लेखक रवींद्र गडकर सर ,साहित्यिक मिलिंद कांबळे ,ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दिलावर तांबोळी इंदापूर ,दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवान पाटील ,ॲड.समृद्धी ढवाण पाटील ,नानासाहेब साळवे ,जयवंत सपकाळ, अविनाश घाटे ,यांसह नवोदित कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सचिन रणपिसे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment