कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये ज्यादा बिल दिलेल्यानी संपर्क करण्याचे आवाहन...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 30, 2023

कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये ज्यादा बिल दिलेल्यानी संपर्क करण्याचे आवाहन...!

कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये ज्यादा बिल दिलेल्यानी संपर्क करण्याचे आवाहन...!                                                                                 बारामती:- कोविड काळात कोरोना झालेल्या रुग्णास शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये ज्यादा आकारलेली रक्कम व अनियमितता दिसून आल्याचे स्पष्ट झाल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची व कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष जाधव(पत्रकार) करणार असून.लवकरच लेखाजोखा सादर करणार असून काही कागद पत्रे मिळाली असून काही बाकी असल्याने व त्रस्त पेशंट व त्यांचे नातेवाईक यांना आवाहन करण्यात येत आहे की,कोरोना काळात हॉस्पिटल मध्ये ज्यादा बिल आकारणी झालेल्या पेशंट व त्यांचे नातेवाईक यांनी मो.9595628383/9595969559 या नंबरवर संपर्क करावा अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन कागदपत्रे जमा करावी जेणे करून खरे बिल व डुब्लिकेट बिल तपासणी करता येईल,यासाठी गेली दिड वर्षे पाठपुरावा चालू असून अखेर काही माहीती उपलब्ध झालीय यासाठी लवकरच जनसंपर्क दौरा काढून पेशंट व त्यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधणार आहे.

No comments:

Post a Comment