बापरे.. मित्राशी मैत्री करत नाही म्हणून रुममेट मैत्रीणीने मैत्रिणीचेच अर्धनग्न फोटो केले इंष्टाग्रामवर व्हायरल...
पुणे:- कोण काय करेल आणि कशासाठी हे कळणे कठीण झाले आहे, नुकतेच एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीने तिच्या मित्राबरोबर मैत्री करण्यास सांगितले.त्याला तिच्या रुममेटने नकार दिला. त्याचा राग मनात धरुन रुममध्ये काढलेले अर्धनग्न फोटो फेक इंस्टग्रामवरुन तरुणीच्या कुटुंबियांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४७/२३)दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिची रुममेट तरुणी, तिचे मित्र दीपक गोरे, आदित्य लोणकर, विशाल ढोकणे (सर्व रा. अहमदनगर),अनोळखी इंस्टाग्राम अकाऊंटधारक, जी मेलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व तिची मैत्रिण कोथरुडमधील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहतात. फिर्यादीच्या मैत्रिणीचे मित्र हे अधूनमधून त्यांच्या रुमवर येत. तिने फिर्यादीसोबत ओळख करुन देत, त्यांच्यासोबत मैत्री करण्यास फोर्स करत होती. फिर्यादी हिने त्यांच्याबरोबर मैत्री करण्यास नकार दिला.त्यावरुन दोघींमध्ये वाद होत होते. रुमवर एकत्र असताना त्यांनी काही खासगी अर्धनग्न फोटो काढले होते. आपल्या मित्रांबरोबर ती मैत्री करत नाही, या रागातून तिने हे फोटो तिच्या मित्रांपैकी कोणाला तरी पाठवले. त्यांनी
वेगवेगळ्या फेक इंस्टाग्रामवरुन ते फिर्यादी व
तिच्या कुटुंबीय व मित्र परिवारामध्ये प्रसारित
करुन फिर्यादीची बदनामी केली असल्याचे म्हंटले असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस हेमंत निरीक्षक पाटील करीत आहेत.
No comments:
Post a Comment