बारामती तालुक्यात फोर व्हीलर व टू व्हीलरचा भीषण अपघात माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू,तर पती व मुलगा गंभीर जखमी...
बारामती :- बारामती तालुक्यातील पारवडी मार्गावर रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती व दोन वर्षांचा मुलगा
गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कोकणे हे पत्नी
रुपाली कोकणे, पाच वर्षांची मुलगी सानवी आणि
दोन वर्षांचा मुलगा यांच्यासह दुचाकीवरून
बारामतीहून पारवडीकडे जात होते. दरम्यान
बारामती-कटफळ-पारवडी मार्गावर परीट वस्ती
जवळ खडकीकडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पाच वर्षांची सानवी मयूर कोकणे व तिची आई रुपाली मयूर कोकणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मयूर कोकणे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
No comments:
Post a Comment