बारामतीत अंतर्गत रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा.. दोष बानपचा की सार्वजनिक बांधकाम विभागाचा.!
बारामती:-विकसित बारामतीत नव्याने रस्त्याचे काम चालू असून या रस्त्याच्या कामाची पाहणी कदाचित ऑफिसमध्ये बसून केली की काय अशी अवस्था झालीय, अश्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाची माहिती प्रकाशित करणार असून उदा. घ्यायचे झालं तर भिगवण रोड नजीक सहयोग सोसायटी च्या अलीकडे वीरशैव मंगल कार्यालय ते दत्त बेकरी रस्त्याच्या कडेला भला मोठा चेंबर खड्डा तसाच ठेवला असून याठिकाणी वयोवृद्ध व लहान मुलं फिरायला येत असतात त्यामुळे हा खड्डा धोकादायक झाला असून त्याचे तात्काळ काम करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहे, तसेच रस्त्याचे कामही ओबड धोबड झाला असल्याचे सांगितले जात आहे, याकडे तात्काळ लक्ष देऊन प्रत्यक्षात हे काम बारामती नगर परिषदे कडून होतंय की सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करतंय हे कळायला मार्ग नसल्याचे सांगतात, मात्र स्थळ पाहणी अधिकारी हे कितीवेळा या कामावर आले याची कुणाला माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment