महिला लैगिक अत्याचार प्रकरणात बारामतीचा उद्योजक मनोज तुपेला अटकपूर्व जामीन मंजूर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 3, 2025

महिला लैगिक अत्याचार प्रकरणात बारामतीचा उद्योजक मनोज तुपेला अटकपूर्व जामीन मंजूर..

पुणे :-नुकताच बारामतीत एका उद्योगजकाने लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या उद्योग क्षेत्रात एकच खळबळ  उडाली,पुणे, बारामती याठिकाणी या बाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत, नुकताच या घटनेतील बारामतीचा उद्योगपती मनोज कुंडलिक तुपे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर जिल्हा व सत्रन्यायालयाने निर्णय देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.हडपसर पोलीस ठाण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणीने मनोज तुपे याच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तुपे याने स्वतःचा बचाव करत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, झालेल्या सुनावणीतन्यायालयाने तुपे यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.तक्रारीनुसार, आरोपीने "लग्न करू" अशी आश्वासनं देत२०२१ पासून विविध ठिकाणी पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप होता. मात्र तुपे यांच्यावतीने सादर केलेल्या बाजू व प्राथमिक पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीनमंजूर केला असल्याचे समजते.या निर्णयामुळे या प्रकरणात नवीन वळण आलं असून, पुढील तपासात तुपे यांची भूमिका स्पष्ट होणार असून यातील सत्यता बाहेर येईल खरंच असे गुन्हे घडतात का?की त्या घडविले जातात याचाही तपास होणे गरजेचे असून अश्या अनेक घडत असताना एखादाचा बळी जाऊ नये अशी प्रतिक्रिया जनमानसातुन उमटत आहे.

No comments:

Post a Comment