बारामतीत नगराध्यक्षपदी कुणी लायक नसल्याची चर्चा..जयदादा पवार यांनाच उमेदवारी देण्याची मागणी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 2, 2025

बारामतीत नगराध्यक्षपदी कुणी लायक नसल्याची चर्चा..जयदादा पवार यांनाच उमेदवारी देण्याची मागणी..!

बारामतीत नगराध्यक्षपदी कुणी लायक नसल्याची चर्चा..जयदादा पवार यांनाच  उमेदवारी देण्याची मागणी..!बारामती(संतोष जाधव):-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होताच केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणूनच बारामतीत नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगत घेणार आहे, यासाठी इच्छूक उमेदवार गुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत तर नगराध्यक्ष पद जनतेतून असल्याने व ते सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्याने अनेकजणांची यासाठी नावे पुढे येत आहेत,मात्र यामध्ये प्रामुख्याने एकही नगराध्यक्ष पदासाठी लायक नसल्याचे जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहे, कुणी हे अगोदरच भोगले आहेत ते पुन्हा येणार का?तर कुणी अनुभवी नाहीत की ज्यामुळे विकसित  बारामतीचा वाढता विकास पहाता किती टिकून ठेवतील की, पुन्हा नगराध्यक्ष पद एकाकडे मात्र कारभार दुसऱ्याने हकायचा हे चित्र दिसणार का?याबद्दल जनतेतून नाराजी पसरली असून ती मतदानातून दिसून येऊ नये म्हणून लायक असा व सर्वसामान्य जनतेला व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करणारा असावा असा नसेल तर सरळ जयदादा पवार यांनाच नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभे करावे जेणे करून बारामतीचा कारभार सरळ चालेल यामध्ये हस्तक्षेप होणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment