जळगाव:-व्हिडीओ काढल्याचा राग कुठल्या स्थराला जातोय व काय घटना घडतेय हे नुकताच घडलेल्या घटनेतून दिसून येथे पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.विजय भिमा राठोड असं मयत तरुणाचे नाव आहे.तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव असं अटक केलेल्या पती,पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे
परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.नेमकी काय आहेत घटना ?मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय राठोड याने आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये
चित्रित केल्याची माहिती तिच्या पती संजय जाधव याला मिळाल्यानंतर दोघांमध्ये संताप निर्माण झाला. याच कारणावरून विजयचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी विजयवर हल्ला करून त्याची हत्या केली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. विजय काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता.
तपासादरम्यान संशयाची सुई संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली यांच्याकडे वळल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी मृत विजयचा भाऊ संजय भीमा राठोड (वय २५) यांनी फिर्याद दिल्यानंतर पिंपळगाव हरे पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १३ मार्च संजय जाधव आणि
सोनाली जाधव या दोघांना अटक केली. दरम्यान, विजय राठोड याची हत्या नेमकी कशी करण्यात आली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावण्यात आली याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment