बारामती तालुक्यात मुरमाची बेकायदा वाहतूक,किरकोळ कारवाई सोडून कडक अशी कारवाई नाही.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 14, 2026

बारामती तालुक्यात मुरमाची बेकायदा वाहतूक,किरकोळ कारवाई सोडून कडक अशी कारवाई नाही..

बारामती तालुक्यात मुरमाची बेकायदा वाहतूक,किरकोळ कारवाई सोडून कडक अशी कारवाई नाही..
बारामती:- बारामती तालुक्यातील काही गावात मुरूम, विटभट्टी माती, ओव्हर लोड रेती, खडी अशी वाहने बेकायदेशीर राजरोस पणे वाहतूक करीत असताना त्या भागातील तलाठी व मंडल अधिकारी आर्थिक माया घेऊन कारवाई करीत नसल्याचे स्थानिक रहिवाशी सांगतात. या वाहणामुळे अपघात होत आहे, रस्ते खराब होत आहे अशी परिस्थिती निर्माण होत असताना तहसीलदार कारवाई कडक करतील का? असा प्रश्न सर्वसामान्यला पडला आहे, कमी रॉयल्टी भरून ज्यादा मुरूम, माती उतखनन करायचे याची चौकशी होणार का? असा जाब विचारला जात आहे,बारामती तालुक्यातील अशी किती तरी गाव आहे त्याठिकाणी अवैध मुरूम व माती उत्तखनन होत आहे, याचा पर्दापाश लवकरच होईल परंतु सद्या कारवाई होणार का? जशी नुकताच एक कारवाई केली.
कन्हेरी गावच्या हद्दीत जळोची ते लाकडी रस्त्यावरून डंपरमध्ये
मुरूम भरून त्याची बेकायदा
वाहतूक केल्याप्रकरणी चालकासह मालकाविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात पर्यावरण अधिनियम व खोणखनिज अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमासह अन्य
कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपरचालक आयुब हजीज शेख व मालक अनिल
शिवाजी देशमुख (रा. बारामती)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मंडल अधिकारी राजेंद्र विठ्ठल गिरमे यांनी
फिर्याद दिली. शुक्रवारी (दि. १३)सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. तहसीलदारांच्या आदेशान्वये सध्या तालुक्यात अनधिकृत उत्खनन व वाहतूक प्रतिबंध कारवाई केली जात आहे. मंडल अधिकारी गिरमे हे
कन्हेरी परिसरात गस्तीवर असताना त्यांना जळोची ते लाकडी रस्त्यावरील पुलावर मुरूम घेऊन जाणारा डंपर (एमएच ४२ बीएफ
६९७०) दिसला. त्यामध्ये पाच ब्रास मुरूम भरण्यात आला होता.तो पालखी महामार्गावरून वंजारवाडीकडे नेला जात होता.चालकाला थांबवून त्याचे नाव विचारले असता आयुब शेख असे सांगण्यात आले. अनिल देशमुख
यांच्या मालकीचा हा डंपर आहे.त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment