*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ४४८ नागरिकांना लाभ-तहसीलदार स्वप्नील रावडे*
*येत्या २० मार्च रोजी करंजेपुल येथे शिबीराचे आयोजन*
*नागरिकांना शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन*
बारामती, दि. १४: महसूल विभागाच्यावतीने शिर्सुफळ येथे रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ४४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. येत्या २० मार्च रोजी करंजेपुल येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले.
श्री. रावडे म्हणाले, नागरिकांना विविध विभागाच्या सेवा एकाच छताखाली देण्यासाठी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजन करण्यात येत आहे.
महसूल विभागातील प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त पत्रके तयार करणे, पाणंद रस्ते, ई-मोजणी अर्ज, जिवंत ७/१२ टप्पा २ अंतर्गतच्या नोंदीबाबत मार्गदर्शन केले. विविध विभागाच्या योजना व सेवांविषयी मार्गदर्शन केले. या शिबीरामध्ये नागरिकांना भेडवासणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यात येत आहे, असेही श्री. रावडे म्हणाले.
तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते विविध विभागामार्फत देण्यात आलेल्या लाभाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शोभा शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिकेत गावडे, सदस्या शामल वाबळे,
गट विकास अधिकारी किशोर माने, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संजय धोंगडे, महसूल नायब तहसिलदार स्वाती गायकवाड, सरपंच जुई हिवरकर, शिर्सुफळचे मंडळ अधिकारी अश्फाक इनामदार तसेच मंडळातील ११ गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment