कल्याण:-हनी ट्रॅप व ब्लॅकमेल करून वेटीस धरण्याचे प्रक्रार सुरु आहेत, नुकताच कल्याण पूर्वेतील एका ४५ वर्षाच्या नागरिकाच्या अश्लिल प्रतिमा तयार आणि संकलित करून त्या समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्या बदल्यात पैसे उकळण्याची शक्कल लढविणाऱ्या एका भुरट्या इसमाच्या त्रासाला कंटाळून या नागरिकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन
आत्महत्या केली.या नागरिकाच्या मोबाईल संपर्कातील संवाद, त्याला आलेल्या ईमेलच्या माध्यमातून या आत्महत्येचा उलगडा झाला आहे. कोळसेवाडी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.गेल्या दोन महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी भागात राहत असलेले हेमंत दयाशंकर पांडे (४५) यांनी कैलासनगर भागातील आपल्या जुन्या घरात घराच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. हेमंत यांनी अचानक आत्महत्या का केली याविषयी कुटुंब अस्वस्थ होते.हेमंत यांचे मोठे भाऊ राजेश पांडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
राजेश पांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की हेमंत याने आत्महत्या का केली याची चौकशी आम्ही त्याच्या मित्राकडे केली. त्यावेळी एका मित्राने हेमंत काही तरी सायबर गुन्ह्यात फसला असल्याचे वाटत होते. हेमंतला दोन लाख
रूपये रकमेची गरज होती. त्याने आपल्याकडे एक लाख ६० हजार रूपये मागितले होते. स्वताकडे त्याच्याजवळ ४० हजार रूपये होते. ही रक्कम वेळेत भरणा केली नाहीतर मोठी समस्या निर्माण होईल, असे हेमंत बोलत होता, असे मित्राने राजेश यांना सांगितले.या माहितीनंतर राजेश पांडे आणि कुटुंबीयांनी हेमंत पांडे
यांचे मोबाईल आणि त्यांचे ईमेल तपासले. त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाली. हेमंत यांना एका ईमेलवरून त्यांचे अश्लिल छायाचित्रे पाठविण्यात आली होती. ही अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन समोरील व्यक्ती हेमंतकडून पैशांची मागणी करत होता. हे पैसे वेळेत दिले नाहीतर समाज माध्यमांत बदनामी
करण्याची धमकी दिली जात होती. त्यानंतर कुटुंबीयांनी हेमंत यांचा मोबाईल तपासला. त्यामध्येही त्यांच्या अश्लिल प्रतिमा संकलित करून त्या प्रसारित करण्याची धमकी समोरील अनोळखी इसमाने दिली होती.पैसे भरणा केले नाहीतर आपल्या अश्लिल प्रतिमा प्रसारित
होतील आणि आपली बदनामी होईल असे हेमंतला सारखे वाटत होते. कुटुंबीयांनी हेमंत यांचे बँक खात्यामधील व्यवहार बँकेच्या माध्यमातून तपासले. त्यावेळी एप्रिल २०२५ ते जून २०२६ या कालावधीत मोठया रकमांचे
व्यवहार त्याच्या खात्यावर झाले होते. ही रक्कम अनोळखी इसमाने आपल्या खात्यावर वळती करून घेतली होती.अनोळखी इसमाने हेमंत यांना अश्लिल प्रतिमा समाज माध्यमांत प्रसारित करून देण्याची धमकी दिली. या माध्यमांतून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. एवढे पैसे देणे
शक्य नाहीत या विवंचनेतून हेमंत पांडे याने आत्महत्या केल्याचा संशय घेऊन कुटुंबीयांनी अनोळखी इसमा विरूध्द तक्रार केली आहे.अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment