नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, शिवसेनेसोबत युती झाली नाही,तर...' काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 5, 2025

नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, शिवसेनेसोबत युती झाली नाही,तर...' काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस.

नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, शिवसेनेसोबत युती झाली नाही,तर...' काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस.
कोल्हापूर:-नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापल्या परीने ज्या त्या स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत.तसंच उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका करताना यानिमित्ताने घराबाहेर पडले असा टोला लगावला आहे.तसंच राज ठाकरेंना फक्त निवडणूक पुढे ढकलणं इतकंच
उत्तर हवं असल्याची टीका केली आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि
नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या परीने संबंधित स्तरावर युतीबाबत निर्णय
घेतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तिघे एकच आहोत.कुठे युती झाली नाही तर निवडणुकीनंतर युती होईल.त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास.

No comments:

Post a Comment