पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया.. पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आरोप होत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे)आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर सदर व्यवहार प्रकरणावर टीका केली.कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करण्यात आली. तसेच या व्यवहार प्रकरणात केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले. झी २४ तास वृत्तवाहिनीने सदर वृत्त दिल्यानंतर या प्रकरणी विरोधकांनी टीका सुरू केली. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.पुढे ते म्हणाले पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्यावर आरोप होताच माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली. यावर नागपूर येथे बोलत असताना ते म्हणाले, 'सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग,आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन.'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे,त्याबाबत दिशा स्पष्ट करू.'उपमुख्यमंत्रीही (अजित पवार) अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घालतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल', अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांनुसार, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी केली. केवळ एक लाख रुपये भांडवल
असलेल्या या कंपनीने या जमिनीवर आयटी पार्क
उभारण्याचे तयारी चालवली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली, असा आरोप दानवे यांनी केला.अंबादास दानवे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, 'एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल
इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगतील का हे लवकरच कळेल.
No comments:
Post a Comment