दारुविक्री करणारी टोळी तडीपार ... वालचंदनगर:-वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे 1 ) सौ. ललिता कांतीलाल भारती ( टोळीप्रमुख ) तसेच त्यांचे टोळीतील सदस्य
2) प्रदिप कांतीलाल भारती 3) संदिप कांतीलाल भारती 4) सोनल संदिप भारती 5 ) कांतीलाल बाळु भारती सर्व रा. काझड ता.इंदापुर जि. पुणे हे सर्वजनानी आपले आपली टोळी निर्माण करुन आपले टोळीची दहशत निर्माण करणेकरीता तसेच आपले आर्थीक
प्राप्ती करीता बेकायदेशीर अवैद्य दारु विक्री, महाराष्ट्र राज्यात बंदी करणेत आलेला गुटखा विक्रीचा व्यवसाय , तसेच विनयभंग,
चोरुन दारु विक्री करीत असलेबाबत पोलीसांना माहिती दिली या कारणावरुन बेकायदा जमाव जमवुन जबर दुखापत करणे अशा
प्रकारे जनतेत दहशत निर्माण करणेकरीता गंभीर गुन्हे वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत केलेले आहेत. त्याचे टोळीच्या अवैद्य
व्यवसायामुळे सामान्य लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत बरीच तरुण मुले व कुंटुबप्रमुख व्यसनाधिन झालेले आहेत त्या व्यसनामुळे कौटुबिक कलह निर्माण झालेले असल्याने सर्वसामान्य लोकांचे कौटुबिक स्वास्थ बिघडलेले आहे त्यामुळे वालचंदनगर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक यांनी मा.नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. बारामती यांचे मार्फत सदर इसमाना तडीपार करणेबाबत मा. डॉ. अभिनव देशमुख सो. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर इसमाविरुध्द चा प्रस्ताव तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा चौकशी अहवाल, गोपणीय साक्षीदार जबाब, अभिलेखावर असलेले गुन्हे या सर्वाचे अवलोकन करुन मा. डॉँ. अभिनव देशमुख सो. हद्दपार प्राधिकरण यांचे न्यायालय तथा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी बारामती, दौंड, पुरदंर या तालुक्यात 3 महिन्याकरीता हद्दपार केलेले आहे.
1) सौ. ललिता कांतीलाल भारती वय 55 वर्षे 2) प्रदिप कांतीलाल भारती वय 28 वर्षे 3) संदिप कांतीलाल भारती वय 32 वर्षे 4) सौ सोनल संदिप भारती वय 25 वर्षे 5) कांतीलाल बाळू भारती वय 62 वर्षे सदरची कामगिरी मा. अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. मिंलीद मोहिते सो अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, मा. नारायण शिरगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 प्रमाणे पुणे जिल्ह्यातील इंदापुर मार्गदर्शनखाली दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलिस स्टेशन यांनी पार पाडली
No comments:
Post a Comment