धक्कादायक.. बारामती शहरात नामांकित लॉजमध्ये महिलेचा पतीनेच केला खून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 4, 2024

धक्कादायक.. बारामती शहरात नामांकित लॉजमध्ये महिलेचा पतीनेच केला खून..

धक्कादायक.. बारामती शहरात नामांकित 
लॉजमध्ये महिलेचा पतीनेच केला खून..
बारामती:- बारामतीत नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा झाला, कार्यक्रम होतायेत तोच  बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका नामांकित लॉजमध्ये एका महिलेचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले व पुढील तपासाच्या कामाला लागले,संबंधित महिलेचा पतीनेच हा खून
केल्याची आणि हे दांपत्य दौंड तालुक्यातील
असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान,आज सायंकाळी हा खूनाचा प्रकार घडला असूनसंबंधित महिलेच्या पतीनेच नातेवाईकांना याबद्दल माहिती दिल्याचे कळतंय.
या घटनेनंतर बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका लॉजवर आज एक जोडपे आले होते. सायंकाळी यातील महिलेचा पती लॉजमधून बाहेर पडला. त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती स्वत:च नातेवाईकांना
दिली. त्यानंतर नातेवाईकांनी बारामतीतील या लॉजचा शोध घेतल्यानंतर ही घटना उघड झाली आहे.दरम्यान, पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली किंवा या घटनेमागील सत्य पोलीस तपास करीत असून अधिक माहिती पुढे येईल.असाच एका लॉजवर एक इंजिनिअर महिलेचा खून झाला होता बारामती शहर व आसपासच्या भागात असणाऱ्या लॉजवर काही संशयास्पद घटना घडत असतील तर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये कळवावे.

No comments:

Post a Comment