खळबळजनक..बारामतीत लॉजवर चारित्र्याच्या संशयावरून बायकोचा नवऱ्याने केला खून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 4, 2024

खळबळजनक..बारामतीत लॉजवर चारित्र्याच्या संशयावरून बायकोचा नवऱ्याने केला खून..

खळबळजनक..बारामतीत लॉजवर चारित्र्याच्या संशयावरून बायकोचा नवऱ्याने केला खून..
बारामती:-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा संपतो तोच खळबळ जनक बातमी वाऱ्यासारखी बारामती शहरात पसरली ती नवऱ्यानेच बायकोचा खून केल्याची तीही नामांकित लॉजवर आणि तर्क वितर्क सुरू झाले,गंगासागर लॉजवर ही घटना घडल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, डी वाय एस पी गणेश इंगळे, डॉ सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सह पोलीस पथक हजर झाले आणि तपासला सुरुवात झाली,याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता दि. 04/02/2024 रोजी सायंकाळी 7/00वा चे पुर्वी मौजे बारामती सिनेमारोड येथी गंगासागर लॉजमधील रुम नं. 207 मध्ये महिलेचा मूर्तदेह आढळून आला,मयत- रेखा विनोद भोसले वय 36 वर्षे रा. सोनवडी ता. दौड जि.पुणे यांचे नातेवाईक महादेव धोडिबा सोनवणे वय 58 वर्षे धंदा शेती रा. सोनवडी ता. दाँड जि पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबवरून दि. 04/02/2024 रोजी सायंकाळी 7/00वा चे पूर्वी मौजे बारामती सिनेमा रोड येथील गंगासागर लॉज मधील रुम नं. 207 मध्ये माझी मुलगी रेखा विनोद भोसले वय 36 वर्षे रा. सोनवडी ता.दौंड जि. पुणे हीस विनोद गणेश भोसले याने नेहुन तीचे चारित्र्यावर संशयाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तिचा कशाने तरी खुन केला आहे म्हणून माझी विनोद गणेश भोसले रा. बी विंग रुम नं. 2 माळसाईकृपा, आप्पा शास्त्रीनगर, कोपर रस्ता डोबवली यांचेविरुध्द फिर्याद आहे, वगैरे मजकुर वरुन अंमलदार -सहा फौजदार विलास  मोरे यांनी बा.श.पो.स्टे .गु रजि नं. 111/2024 भादवी कलम 302 नुसार दाखल करून घेतली तर तपास अधिकारी- स पो नि चेके यांच्याकडे देण्यात आला.

No comments:

Post a Comment