बापरे.. दिवसाढवळ्या बारामतीत नवरा बायकोचा गळा चिरून खून..खुनाच रहस्य काय? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 13, 2024

बापरे.. दिवसाढवळ्या बारामतीत नवरा बायकोचा गळा चिरून खून..खुनाच रहस्य काय?

बापरे.. दिवसाढवळ्या बारामतीत नवरा बायकोचा गळा चिरून खून..खुनाच रहस्य काय?
 बारामती :- बारामती शहरात कसबा जामदार रोड नजीक खत्री पवार अपार्टमेंट मध्ये भरदिवसा नवरा बायकोचा खून झाला असून या खुनाच रहस्य काय?याचा पोलीस शोध घेत असून या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पोलीस अधिकारीसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सचिन महालिंग वाघोलीकर (वय ५०) व त्यांच्या पत्नी सारिका (वय ४२) या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. शहरातील जामदार रस्त्यावरील खत्री - पवार पार्कमधील अपार्टमेंट मधील क्रमांक १०२ मध्ये ही घटना उघडकीस आली. त्यांची मुले शनिवारमुळे शहरानजीक कन्हेरी येथे मारुती मंदिरात दर्शासाठी गेली होती. ती परत आली असता घराला बाहेरून कडी असल्याचे दिसून आले. त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट व दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. किचनमध्ये पाहिले
असता या दोघांचे मृतदेह आढळून आले.तात्काळ पोलिसांना याची खबर देण्यात आली, भर दिवसा
घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली
आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला की घातपात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.मागील काही महिन्यांपूर्वी बारामती शहरातील मद्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या लॉजवर महिलेचा खून झाला असताना आत्ता नवरा बायको चा खून यामुळे बारामतीत गुन्हेगारी वाढती की काय याची भीती निर्माण सर्वसामान्य नागरिकांना झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

No comments:

Post a Comment