अवैध सावकाराकडून 12 लाखाच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; सावकार अटकेत..अवैध सावकारीची तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन.!
नाशिक(प्रतिनिधी):-सावकारी धंदे करणाऱ्याचे प्रमाण वाढत चालले असून याला आळा कधी बसणार आहे, अनेकांचे संसार उदवस्थ झाले असून कित्येकांचे जीव गेले आहे, नुकताच
सावकारी करून कर्जदारांना धमकावणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना, सिडकोतील
अवैध सावकाराने कर्जदाराकडून व्याजासकट पैसे वसुल केल्यानंतरही पुन्हा १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास कुटूंबियांसह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या अवैध सावकाराच्या इंदिरानगर
पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या सावकाराला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैभव यादवराव देवरे (रा. सीमा पार्क, चेतनानगर,
इंदिरानगर) असे खंडणीखोर अवैधरित्या सावकारी करणार्या संशयिताचे नाव आहे. ब्रोकर्स व्यावसायिक विजय भालचंद्र खानकरी (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार,सप्टेंबर २०२३ मध्ये ते आजारी होते. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी त्यांना पैशांची नितांत गरज होती.
संशयित वैभव देवरे हा व्याजाने पैसे देतो, असे त्यांना एकाने सांगितले. त्यामुळे ते संशयित देवरेच्या घरी गेले व तीन लाख रुपये व्याजाने मागितले. देवरे याने दरमहा १० टक्के व्याजदर लागेल, असे सांगून ३ लाखांची रक्कम
त्याने आरटीजीएसद्वारे खानकरींच्या बँक खात्यावर पाठविली. व्याज न भरल्यास ३ लाखांचे सहा लाख रुपये भरावे लागतील असा सज्जड दमही संशयिताने दिला होता. मात्र,
खानकरी यांनी देवरेला व्याजाच्या रकमेसह चार लाख ४७ हजार रूपये दिले. व्याजापोटीच केवळ एक लाख ३२ हजार रुपये दिले. सर्व हिशेब पूर्ण झाल्याने खानकरी यांनी देवरेकडे जमा केलेला 'सिक्युरिटी चेक' घेण्यासाठी गेले असता, संशयिताने टाळाटाळ केली.त्यानंतर मात्र, संशयित देवरे याने फिर्यादी खानकरी यांना
बोलावून घेत, आर्थिक व्यवहार दोन महिन्यांसाठी ठरला असताना, तु वेळेत व्याज व रक्कम दिली नाही. त्यामुळे रक्कम व व्याज मिळून १२ लाख रुपयांची मागणी केली.रक्कम न दिल्यास कुटूंबियांचे बरे-वाईट करण्याची धमकी देत त्याच्या पत्नीविषयी अश्लिल भाष्य केले.
यामुळे घाबरून खानकरी यांनी ६ लाखांचा धनादेश देवरेला दिला. यानंतरही देवरे याने उर्वरित पैसे दिले न दिल्यास खानकरींसह पत्नी व मुलांचे हातपाय तोडेन, कार ओढून नेईल अशी धमकी दिली. अखेर याप्रकरणी खानकरी थेट
पोलीस आयुक्तांकडेच अर्ज केला. त्यानुसार, देवरे
याच्याविरोधात इंदिरानगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने देवरे यास रविवारपर्यंत (ता. १४) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एका राजकीय पक्षाशी जवळीक असलेल्या देवरे याचा सिडकोसह शहरात अवैधरित्या व्याजाचा धंदा चालत असल्याचे कळतंय,त्याने अनेकांच्या आर्थिक कमजोरीचा गैरफायदा घेत मोठी
मायाही जमा केल्याची चर्चा आहे. एका राजकीय पक्षाशी जवळीक साधून 'फार्म' हाऊस पडीक असायचा. परंतु त्याचे कारनामे समजताच त्यास 'बंदी' करण्यात आली. अवैधरित्या सावकरी करून अनेकांची फसवणूक देवरे याने
केली आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याशी संपर्क साधून अर्ज करावेत असे आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केले आहे.
No comments:
Post a Comment