शहर पोलीस स्टेशन हददीत आज रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला काही तासातच ताब्यात घेण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनचे यश.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 13, 2024

शहर पोलीस स्टेशन हददीत आज रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला काही तासातच ताब्यात घेण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनचे यश..

शहर पोलीस स्टेशन हददीत आज रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला काही तासातच ताब्यात घेण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनचे यश..
बारामती;- दिनांक १३ .०४. २०२४ रोजी सकाळी १०.४५ ते १२.३० वा सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं. १०२ कसबा बारामती येथे राहणारे दामपत्याचा मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेवून पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात इसमाने त्या नवरा बायकोचा खुन केल्याची माहिती बारामती
शहर पोलीस स्टेशनला मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार हे घटनास्थळी पोहचले सदर बाबत मा. श्री पंकज देशमुख  पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा. श्री संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री डॉ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सदर घटनेची माहीती देवून यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकरी अंमलदार यांनी तपास सुरू करून तापसाची वेगवेगळी पथके तयार करून जलदर गतीने तपास सुरू केला त्यात पोलीसांना सदरचा गुन्हा हा अर्थीक कारणावरून एका इसमाने केलेला असल्याचे गोपनिय माहीती मिळाल्याने संशयीतास ताब्यात घेतले आहे. प्रथम दर्शनी सदरचा गुन्हा हा आर्थीक व्यवहाराचे कारणावरून झाल्याचे समोर आलेले आहे. आरोपीकडे अधिक तपास चालू आहे.सदर कार्यवाही मा . श्री पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री संजय जाधव,अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री डॉ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके, पोलीस उपनिरीक्षक
घोडके, पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत, बारामती शहर पोलीस स्टेशनकडील अंमलदार व स्था गु.शा.पुणे ग्रामीण अधिकारी अंमलदार यांनी सदरची चांगली कामगीरी केलेली आहे.

No comments:

Post a Comment