धक्कादायक..पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून खून करून घेतलं होतं झोपीचं सोंग..
पुणे :- धक्कादायक घटना समोर आली आहे.पुण्यातील लोणीकंद येथील बुर्केगाव परिसरात पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी
लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मीबाई बाबा जाधवराव (वय ४५, बुर्केगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भरदुपारी घडलेल्या घटनेने बुर्के गावात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी
धाव घेत पती बाबा जाधवराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटूंब बुर्के गावात राहत आहेत. लक्ष्मीबाई या एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. तर, बाबा हा वेल्डींगची कामे करत आहे. त्यांचा मुलगा एक महिन्यांपुर्वी पेरणेफाटा परिसरात राहण्यास गेला होता. बाबा जाधवराव यांना दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिऊन ते पत्नीशी सतत वाद घालत होते.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास बाबा हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर ते एकत्र झोपले. लक्ष्मीबाई या गाढ झोपेत असताना बाबा यांनी पत्नीवर कुऱ्हाडीने घाव टाकून निर्घृण खून केला. त्यानंतर
आरोपीने झोपीचे सोंग घेतले. सकाळी आई फोन उचलत नाही. तसेच ती कामावर देखील अली नाही, त्यामुळे लक्ष्मीबाई यांची मुलगी घरी आली असता घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.तेव्हा वडील बाबा जाधवराव हे झोपलेले होते. तर,आई
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment