बारामती :- बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पीडित महिला “निर्भया” हिला न्याय मिळवून देण्यात बारामती पोलिसांनी उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सदर प्रकरणात आरोपी आण्णा सुरेश ओव्हाळ (वय 43, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा) याने दिनांक 14/06/2024 रोजी पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. पीडित महिलेने दाखविलेल्या धैर्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 453/2024 भा.द.वि. कलम 376(2)(r) अन्वये तत्काळ दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक संध्याराणी देशमुख (WPSI) यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व काटेकोर पद्धतीने केला. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे तसेच इतर तांत्रिक बाबींचे भक्कम संकलन करून आरोपीविरुद्ध ठोस व विश्वासार्ह पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
सदर प्रकरणाची सुनावणी मा. बी. डी. शेळके (जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बारामती) यांच्या न्यायालयात (सेशन केस नं. 163/2024) झाली असता, न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत भा.द.वि. कलम 376(2)(F) अंतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास व ₹20,000/- दंड अशी कठोर शिक्षा सुनावली.
सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता मा. कमलाकर एस. नवले यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
तसेच सदर कामगिरीमध्ये पुढील अधिकारी/अंमलदार यांचा मोलाचा सहभाग राहिला:
सेशन कोर्ट पैरवी अंमलदार : G PSI श्री. कसपटे
जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी : PI श्री. संतोष घोळवे, TMC, पुणे ग्रामीण
कोर्ट कर्मचारी : म. पो. शि. आवटे (699), म. पो. हवा कोकरे (1296)
सर्व अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट समन्वय, तत्परता व दक्षता दाखवून पोलिस दलाची प्रतिमा अधिक उंचावली आहे.
पोलिसांचा ठाम संदेश
“महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईलच.”
महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत बारामती पोलीसांची Zero Tolerance भूमिका कायम राहील.अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी दिली.
No comments:
Post a Comment