अवैध धंदे बंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक कारवाई करतील का? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

अवैध धंदे बंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक कारवाई करतील का?

अवैध धंदे बंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक कारवाई करतील का?            बारामती:- भिगवण ते हडपसर रोडलगत असणाऱ्या काही गावात अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याचे सांगण्यात आले, नुकताच भिगवण अपहरण प्रकरणात अनेकवेळा तसा उल्लेख झाला होता,अवैध मुरूम,वाळू,माती वाहतूक चालू असून त्याचे हप्ते कोणाला जातात याचा लवकरच भांडा फोड होणार असून त्याच बरोबर अवैध दारू, जुगार क्लब, मटका, व गुटखाविक्री होत असल्याचे कळतंय यावर कारवाई कधी होइल अशी प्रतिक्रिया उमटत असून पुणे ग्रामीण पोली स अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार आहेत.या भागातून हवे रस्ता जात असून पुणे -   सोलापूर रोड लगत अनेक ठिकाणी पुणे जिल्हा हद्दीत अवैध धंदे चालू आहे, मुरूम, वाळू वाहतूक चालू आहे असे स्थानिक राहिवाशी सांगतात.

No comments:

Post a Comment