बारामती शहर पोलिसांनी केले जबरी चोरी करणारे जेरबंद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

बारामती शहर पोलिसांनी केले जबरी चोरी करणारे जेरबंद...

बारामती शहर पोलिसांनी केले जबरी चोरी करणारे जेरबंद...                                  बारामती:- दि०२/१२/२०२०बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून कोंढवा पुणे हृददीत जबरीचोरी करणारे आरोपी जेरबंद पूणे शहर पोलीस यांनी वायरलेस मेसेज व्दारे कळविले की कोंढवा पोलीस स्टेशन हददीत बाबदेव घाटात
गारवा हॉटेल जवळ दि.२९/११/२०२० रोजी रात्री ०८:०० वा.चे.सुमारास तीन मोटार सायकल त्यातील एक लाल काळया रंगाची होन्डा कंपणीची करिझमा मोटार सायकल नंबर १२१२ व त्यावर अनोळखी ८ इसमानी फि्यादी
१,३०,०००/-रूपये जबरीचोरी करून चोरून नेले बाबत कोंढवा पोलीस स्टेशन गु.र. नं ११६६/२०२० भा.द.वि.कलम ३९५,३९७,३४१,प्रमाणे गुन्हा दाखल असुन त्याप्रमाणे मा.श्री.पोलीस निरीक्षक नामदेव शिदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, प्रकाश वाघमारे,सहा.पोलीस उपनिरीक्षक जगदाळे,पोलीस नाईक रूपेश साळुखे,सिताप, पो. काँ सुहास लाटणे,दशरथ इंगवले, बंडु कोठे,योगेश कुलकर्णी, अजित राऊत,तुषार चव्हाण,अकबर शेख यांनी बारामती शहर हददीत दि.०१ /१२/२०२० रोजी ००:०० ते ०६:०० वा.वे.दरम्यान फलटण चौकात एक लाल काळया रंगाची होन्डा कंपणीची करिझमा मोटार सायकल नंबर १२१२ मोटार सायकल तसेच पल्सर,मो.सा.एमएच १२,एस.झेड ३५६० इमस नामे १) रोहीत सुरेश बाबर वय २१ वर्षे रा.माहत्माफुले सोसायटी सासवड ता. पुरंदर जि.पुणे२) राजेश सिताराम निघोल वय २२ वर्षे रा.दत्तनगर सासवड ता.पुरंदर जि.पुणे हे दोन इसम वेगवेगळया मोटार सायकलवर मिळुन आल्याने त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना अधिक चौकशी करता पोलीस स्टेशन येथे घेवून येवुन अधिक चौकशी करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे चेतन ऊर्फ भैय्या वैराग, सनि मिसाळ, जगन्नाथ दत्ता वाघमारे, बाबू पुर्ण नाव माहीत नाही.सर्व रा.
महात्माफुले सोसायटी सासवड ता पुरंदर जि.पुणे आम्ही सर्वांनी मिळुन करिझमा व पल्सर, मोटार सायकलवर बाबदेव घाटात गारवा हॉटेल जवळ दि.२९/११/२०२० रोजी रात्री ०८:०० वा.चे. सुमारास एका इसमास रोडवर आडवुन त्यास मारहाण करून त्याची सॅक जबरीने काढुन घेवुन त्यातील रोख रक्कम१,३०,०००/-रूपये आम्ही सर्वांनी वाटुन घेतले व ते सर्व पैसे खर्च केले असे सांगीतले आहे सदर इमसमांना मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले असुन,पुढील तपास कामी कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे.
यांना रोडवर आडवुन त्यांचेकडील सॅक व त्यात असलेले रोख रक्कम सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अभिनव देशमुखे साो.व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते साो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगावकर सो,पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा पोलीस निरीक्षक सचिन शिंदे,प्रकाश वाघमारे,सहा, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस नाईक रूपेश साळुखे,सिताप,पो.
का.सुहास लाटणे,दशरथ इंगवले,बंडु कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, तुषार चव्हाण अकबर शेख यांनी केली असल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment