महिलांसाठी बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी : रागिणी फाऊंडेशनच्यावतीने खास नागपंचमीनिमित्त स्पर्धेचे आयोजन..!!
बारामती : येथील रागिणी फाऊंडेशनच्यावतीने नागपंचमी निमित्त महिलांसाठी खास ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी महिलांनी
' वसा:माणुसकीचा या विषयावर आधारित कमीत कमी ती जास्त दोन मिनिटांचा उखाणा घेणे बंधनकारक आहे. सहभागी स्पर्धकांनी मधून प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ क्रमांक तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रमाणात देण्यात येणार आहे.
सहभागी स्पर्धकांचे विषयाची मांडणी, सादरीकरण, समयसूचकता, एकूण प्रभाव, आणि युट्युब वरील लाईक ,कमेंट्स यावर आधारित गुणांकन केले जाणार असून, कोरोना काळात महिलांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा, पारंपरिकता आणि संस्कृती सोबत वास्तव परिस्थितीवर भाष्य करता यावे, कोरोना काळातही महिलांना सणांचा आनंद घेता यावा,याकरिता उखाणा स्पर्धेचे आयोजन केले आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा
राजश्री आगम यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता दि ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ९६०४३९८६४५ या मोबाईल क्रमांकावर व्हिडिओ पाठवावा.
No comments:
Post a Comment