बारामती तालुक्यातील खामगळवाडीतील बेकायदेशीर खनिज उत्खनन बंद करण्याची मागणी,राष्ट्रपतींकडे तक्रार.... तालुक्यातील इतर भागात बऱ्हाणपूर,गोजुबावी, उंडवडी, रुई सावळ,पणदरे येथे लक्ष घालण्याची गरज - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 3, 2021

बारामती तालुक्यातील खामगळवाडीतील बेकायदेशीर खनिज उत्खनन बंद करण्याची मागणी,राष्ट्रपतींकडे तक्रार.... तालुक्यातील इतर भागात बऱ्हाणपूर,गोजुबावी, उंडवडी, रुई सावळ,पणदरे येथे लक्ष घालण्याची गरज

बारामती तालुक्यातील खामगळवाडीतील
बेकायदेशीर खनिज उत्खनन बंद करण्याची मागणी,राष्ट्रपतींकडे तक्रार....                                                                                    तालुक्यातील इतर भागात बऱ्हाणपूर,गोजुबावी, उंडवडी, रुई सावळ,पणदरे येथे लक्ष घालण्याची गरज.!                                                                    बारामती :- तालुक्यातील अनेक गावात सद्या अवैध मुरूम, वाळू, माती उत्खनन चालू असून यामध्ये प्रामुख्याने उंडवडी, बऱ्हाणपूर,पणदरे,  माळेगाव, गोजुबावी, रुई सावळ सारख्या बऱ्याच गावात मुरूम उत्खनन चालू असून यावर कारवाई होत नाही नव्हे ती केली जात नाही, संबंधित खात्याचा याला पाठिंबा असल्याचे कळते, तर आर टी ओ विभागाला कार्ड चालू असल्याचे सांगण्यात येत आहे, तरी अश्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या वर व वाहतूक करणाऱ्या वर देखील कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे, अशीच एक तक्रार चक्क राष्ट्रपती यांच्याकडे केल्याचे लेखी निवेदन प्रसिद्ध करण्यासाठी आले असून यामध्ये खामगळवाडी येथील बेकायदेशीर उत्खनन बंद करा अन्यथा घंटानाद आंदोलन करण्यात येईल.याबाबत पणदरे येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी भारताचे मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, बाळासाहेब थोरात महसुल मंत्री, सचिव महसुल विभाग, उपविभागीय अधिकारी बारामती यांना निवेदन देण्यात आले आहे.याबाबत विक्रम कोकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार लेखी तक्रार तसेच फोनव्दारे व समक्ष भेटून देवून देखील संबंधीत प्रशासनाने या बेकायदेशीर
गौणखनिज उत्खननास पाठींबा दिलेला आहे. गावकामगार तलाठी ढाकाळे (खामगळवाडी) व लोणीभापकर सर्कल यांनी तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी पंचनामा कला त्या पंचनाम्या मध्ये बेकायदेशीरपणे गौणखनिज उपसा २८ हजार ब्रास केल्याचे निदर्शनास आले. तरी देखील संबंधीत तहसिलदार यांनी कायदेशीर कारवाई करणे तात्काळ अपेक्षीत असताना देखील त्यांनी कोणतेही ठोस अशी कारवाई केलेली नाही उलट त्या गौणखनिज उत्खनन करणाच्या त्यापेक्षाही मोठया प्रमाणात उच्छाद मांडला. यावरून असे निदर्शनास येते की संबंधीत अधिकारी यांचे आर्थिक हित जोपासण्याचे काम तर चालू नाही ना? असे या वरून निदर्शनास येते. शासनाचे कोटयावधी रुपयांचा महसूल बुडवून संबंधीत व्यक्ती ही बेकायदेशीरपणे मालमत्ता कमवित आहे.त्याचबरोबर त्याच व्यक्तीची व संबंधीत अधिकारी यांची सी.बी.आय. मार्फत कमविलेल्या संपत्तीची व संबंधीत अधिकारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून शासनाचे होणारे नुकसान भावावे व संबंधीत गौणखनिज करणारे ठेकेदार यांचेवर फौजदारी वसुलपात्र गुन्हे दाखल करून शासनाचा नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी.

No comments:

Post a Comment