बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी,१,३८,६२८ रू.चा गुटखा केला जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी,१,३८,६२८ रू.चा गुटखा केला जप्त

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी,१,३८,६२८ रू.चा गुटखा केला जप्त
बारामती:- ता.१६/०९/२०२१ रोजी १८/०० वा चे सुमारास सहा . फौ/शशिकांत पवार, पो हवा / ८४३ रमेश भोसले तसेच पोलीस नाईक/२६३५ रणजित मुळीक असे बारामती तालुका पोलीस स्टेशन पोस्टे हदीत मौजे शिर्सुफळ येथे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना मा.पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे शिर्सुफळ ता.बारामती जि पुणे येथे इसम नामे सोमनाथ धोडींबा गोडसे हा बेकायदा बिगर परवाना मानवी आरोग्यास घातक असणारे गुटख्याची विक्री करीत आहे.म्हणुन त्याचे राहते घरी वरील पोलीस स्टाफने पंचासह जावून छापा टाकला असता त्याच्याकडे खालील प्रमाणे गुटख्याचा माल मिळुन आला,१)४८६२०/-रु किंमतीच्या ५ पांढ-या रंगाच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये विमल पान मसाल्याचे ५२ पुडे प्रत्येक पुडयात २२ पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये १८७ प्रमाणे.२) ८५५०/-रु किंमतीच्या ५ पांढ-या रंगाच्या छोटया पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये V1 तंबाखुचे ५२ पुडे प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडया ची किं रुपये ३३ प्रमाणे.३) ३७४४०/-रु किंमतीच्या ६ पांढ-या रंगाच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये विमल पान मसाल्याचे ५२ पुडे प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची किं रुपये १२० प्रमाणे,४) ९३६०/-रु किंमतीच्या ६ पांढ-या रंगाच्या छोटया पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये V1 तंबाखुचे ५२ पुडे
प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडया ची किं रुपये ३० प्रमाणे.५) ३१३२८/- रू किमतीच्या ८ हिरा पान मसाल्याचे प्लॉस्टीकचे पिशवीत पॅक केलेले प्रत्येक पिशवीत ५ पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये २२ पाउच एका पॅकेटची कि रुपये १७८ प्रमाणे,६) २६४०/-रु किंमतीच्या १ पांढ-या रंगाची पिशवी त्या पिशवीमध्ये विमल पान मसाल्याचे २२ पुडे प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची किं रूपये १२० प्रमाणे.
७) ६६०/-रु किंमतीच्या १ छोटी पांढ-या रंगाची पिशवी त्या पिशवीमध्ये V1 तंबाखुचे २२ पुडे प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची  किं रुपये ३० प्रमाणे १,३८,६२८/-असा माल मिळुन आल्याने सदर बाबत पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी मौजे शिर्सुफळ ता.बारामती जि पुणे येथे इसम नामे सोमनाथ धोडींबा गोडसे वय ४३ वर्षे रा शिर्सुफळ महादेव मळा ता.बारामती जि पुणे मुळ रा सौधणी ता मोहोळ जि सोलापुर हा मा.अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधीक
आदेश कमांक असुमाअ/अधिसुचना/७९४/१८०७ दिनांक २०/०७/२०१८वा असुमाअ/ अधिसुचना/७९५/१८०७ दिनांक २०/०७/२०१८ नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट तंबाखु,सुपारी यामुळे मुखाचा कर्करोग ओरल सब्युकास फायग्रोसीस गुणसुत्रातील विलाग्र शारीरीक हानी होत
असल्याने त्याचे उत्पादन साठा वितरण व वाहतुक विक्री यावर बंदी घातली असताना सदर आदेशाचे उल्लघंन करुन त्याने वरील वर्णनाचा गुटका मुददेमाल विक्री करण्याचे उददेषाने आपले कब्जात बाळगले स्थितीत मिळुन आल्याने माझी सरकार तर्फे मा.पोलीस महासंचालक म.रा मुंबई यांचे कडील आदेश क्रमांक पोमस/२२/प्रतिबंधीक अन्न पदार्थ बंदी/कारवाई/६३३ / २०१८. २०२० मुंबई दिनांक १६/०७/२०२०अन्वये भादंवि कलम ३२८,२७२,२७३,प्रमाणे कायदेशिर फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहा.पोलीस फौजदार/पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख ,मा. अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण, सहा. पोलीस फौजदार शशिकांत पवार, पोलिस हवालदार रमेश भोसले, पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment